वायुगळतीने तालुक्यातील नागरिकांना श्वसनाचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:48 IST2018-12-07T00:48:13+5:302018-12-07T00:48:15+5:30
उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीतील आणि चिर्ले गावाजवळ वसलेल्या वैष्णो लॉजिस्टिक यार्डमध्ये लागलेल्या आगीमुळे हवेत पसरणाऱ्या घातक केमिकल्सच्या उग्र वासामुळे आता येथील रहिवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.

वायुगळतीने तालुक्यातील नागरिकांना श्वसनाचा त्रास
उरण : उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीतील आणि चिर्ले गावाजवळ वसलेल्या वैष्णो लॉजिस्टिक यार्डमध्ये लागलेल्या आगीमुळे हवेत पसरणाऱ्या घातक केमिकल्सच्या उग्र वासामुळे आता येथील रहिवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.
सदर यार्डमधील घातक केमिकल्स नाल्याद्वारे खाडी परिसरात पसरल्याने खाडीतील मासे मृत्युमुखी पडले आहेत. इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी कोणावरही कारवाईचा बडगा उगारला नसल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
यार्डच्या दुर्घटनेला शासनाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप भयभीत झालेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी राहुल मोटे यांना या घटनेसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, वैष्णो लॉजिस्टिक यार्डमध्ये लागलेल्या आगीसंदर्भात आमची कारवाई सुरू आहे.