फसवणूक करणाऱ्यांना अटक
By Admin | Updated: August 14, 2015 23:49 IST2015-08-14T23:49:46+5:302015-08-14T23:49:46+5:30
बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गंडवून लुटणाऱ्या टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३१ हजारांची रक्कम जप्त केली असून दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

फसवणूक करणाऱ्यांना अटक
नवी मुंबई : बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गंडवून लुटणाऱ्या टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३१ हजारांची रक्कम जप्त केली असून दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे. फिरोज खान (१९), विजय शाहू (३१), मदन दास (३२) आणि रसिद सय्यद (३१) अशी त्यांची नावे आहेत.
या टोळीची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. सापळा रचला होता. पोलिसांनी सापळा रचून चौघांना अटक केली. दोन गुन्ह्यांची उकल वाशी पोलिसांनी केली आहे. तसेच त्यांच्याकडून ३१ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
आपल्याकडे चोरीचे पैसे असून ते गावी पाठवायचे आहेत, असे ही टोळी बँकेतील ग्राहकाला सांगायची. स्वत:कडील जास्त रकमेचे आमिष दाखवून रुमालात गुंडाळलेल्या नोटांचे बंडल त्यांना द्यायचे. बँक ग्राहकाकडील रक्कम घेऊन ते पळून जायचे. मात्र प्रत्यक्षात नोटांच्या आकाराचे कागद असायचे. वाशीतील एसबीआय बँकेत साहाय्यक निरीक्षक अजित गोंधळी, उपनिरीक्षक देविदास पालवे, पोलीस नाईक श्रीकांत तुंबडा, संदीप पाटील यांनी हा कारवाई केली. त्याबद्दल पथकाला १० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)