प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीला अटक
By Admin | Updated: September 23, 2015 04:20 IST2015-09-23T04:20:10+5:302015-09-23T04:20:10+5:30
बसमधील प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तिन गुन्ह्यांची उकल झाली असून ५१ हजार रुपयांची रक्कमही पोलीसांनी जप्त केली आहे.

प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीला अटक
नवी मुंबई : बसमधील प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तिन गुन्ह्यांची उकल झाली असून ५१ हजार रुपयांची रक्कमही पोलीसांनी जप्त केली आहे.
बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पाकीट चोरीला गेल्याच्या घटना काही दिवसांपासून शहरात घडत होत्या. अशाच प्रकारे बसमध्ये अडवणुक करुन प्रवाशाचे १० हजार रुपये चोरल्याची घटना रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यामुळे बसमधील पाकीटमार टोळीच्या शोधात गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पाऊल उचलले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने खिसे कापणाऱ्या टोळीच्या तिघांना अटक केली आहे. जुबेर सय्यद (३२), सचिन कुचिकोरवे उर्फ सत्या (२८) व भास्कर पाल (३५) अशी त्यांची नावे आहेत. तिघेही अनुक्रमे मुंब्रा, धारावी व गोवंडीचे राहणारे आहेत. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरिक्षक राजन जगताप यांच्या पथकाने प्रथम जुबेरला अटक केल्यानंतर त्याच्या माहितीनुसार इतर दोघांना अटक करण्यात आली. त्यांनी एपीएमसी व वाशी परिसरात गुन्हे केले असून त्यापैकी तिन गुन्ह्यांची उकल झाली आहे. या गुन्ह्यातील ५१ हजार ७०० रुपयांची रक्कम पोलीसांनी टोळीकडून हस्तगत केली आहे. त्यांच्याकडून इतर अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. या टोळीमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का, याचीही पोलीस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)