कसारा दोन दिवस बंद

By Admin | Updated: September 17, 2014 02:43 IST2014-09-17T02:43:30+5:302014-09-17T02:43:30+5:30

गणपती विसर्जन मिरवणुकीत गाणी लावण्यावरून झालेल्या वादाचे पुनर्वसन चौथ्या दिवशी हाणामारीत होऊन जखमी झालेल्या सचिन रोंगटे या इंजिनीअरचा तब्बल 6 दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.

The cassara closed for two days | कसारा दोन दिवस बंद

कसारा दोन दिवस बंद

कसारा : गणपती विसर्जन मिरवणुकीत गाणी लावण्यावरून झालेल्या वादाचे पुनर्वसन चौथ्या दिवशी हाणामारीत होऊन जखमी झालेल्या सचिन रोंगटे या इंजिनीअरचा तब्बल 6 दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे कसा:यात तणाव असून परिसरात सोमवारपासून बंद पाळण्यात येत आहे.
कसा:यातील ‘एकता मित्र मंडळ, शिवाजीनगर’च्या गणपती विसर्जनादरम्यान कसारा रेल्वे स्थानकावर भेळ विक्री करणा:या काही टार्गट मुलांनी मिरवणुकीत गाणी लावण्यावरून वाद सुरू केला. कार्यकत्र्यानी मिरवणुकीदरम्यान वाद नको म्हणून माघार घेतली, मात्र याचा राग मनात ठेवून या तरूणांनी दोन दिवसानंतर मंडळाचे कार्यकर्ते सचिन रोंगटे, दिनेश जाखेरे, कैलास मराडे यांना कसारा स्थानकात बेदम मारहाण केली. त्यानंतर शिवाजीनगर येथील तरूणांनीही तिथे जाऊन मारामारी केली. यात सचिनच्या डोक्यावर वार केल्याने तो बेशुध्द पडला तर कैलास मराडेचा हात फ्रॅर झाला़  सचिनला ठाण्यात ‘क्रिटी केअर हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. तेथे सोमवारी सकाळी 8 वा. त्याचा मृत्यू झाला. या वृत्तामुळे कसा:यात तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली. संतप्त कार्यकत्र्यानी कसारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली. सचिनचा मृतदेह कसा:यात आणल्यानंतर 6क्क् लोकांच्या जमावाने मृतदेह शिवाजी महाराज चौकात ठेवून जोर्पयत आरोपींना अटक होत नाही, तो र्पयत  मृतदेह हलविणार नाही, असा पवित्र घेतला. शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत वाघुंडे आरोपीला  अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमावाने मृतदेह अंत्यविधीसाठी नेला़
या घटनेमुळे आदीवासी महादेव कोळी समाजाने सोमवार व मंगळवारी  कसारा बंदची हाक दिली होती. दोन्ही गटांतील काही आरोपींना अटक करण्यात आली आह़े मंडळाच्या दिनेश जाखेरे, प्रकाश भारमल व अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणा:या पियुष जगताप, अक्षय जगताप, निलेश उर्फ डिग्या उबाळे यांना अटक करण्यात आली आह़े संदीप पंडीत, वसंत उबाळे, पप्पू चिकणो, जनाबाई जगताप, राणी जगताप व अन्य 1क् ते 12 जण पसार झाले आहेत़
 
फरारी आरोपी येत्या 
24 तासांत शरण येतील. त्यांच्यावर कायदेशिर कडक कारवाई करण्यात येईल.
- प्रशांत वाघुडे, 
डीवायएसपी, शहापूर
 
या घटनेची चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करावी.
- चंद्रकांत जाधव, 
पदाधिकारी, शिवसेना

 

Web Title: The cassara closed for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.