शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार साताऱ्याचा, टेन्शन ठाणे मावळच्या उमेदवारांना

By नारायण जाधव | Updated: April 11, 2024 06:49 IST

माथाडी कामगार मूळ गावी जाण्याची भीती

नारायण जाधव

नवी मुंबई : महाविकास आघाडीने साताऱ्यातून माथाडी नेते आ. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी  दिली आहे. महायुतीकडून छत्रपती उदयनराजे, नरेंद्र पाटील इच्छुक आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघांसह मावळ लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या उरण आणि पनवेल या विधानसभा मतदारसंघांत माथाडी कामगारांची संख्या ५० हजारांवर आहे. यापैकी बहुतेक कामगार मतदानासाठी गावी जातील. ठाणे, मावळ मतदार संघांतील महायुती आणि महाविकास  आघाडीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि उरण या चारही विधानसभा मतदारसंघांतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा, भाजीपाला मार्केट,  फळ मार्केट, साखर-मसाला मार्केटसह दाणा बंदर या पाच बाजारपेठा, एमआयडीसीतील विविध कंपन्या, शीतगृह, कळंबोलीतील स्टील मार्केट, सीडब्ल्यूसीची गोदामे, उरणच्या जेएनपीए बंदरातील विविध टर्मिनल, कंटेनर यार्डमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. हे कामगार पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील आहेत. त्यातही सातारा लोकसभा मतदारसंघात  मोडणाऱ्या कऱ्हाड, पाटण, जावळी या विधानसभा क्षेत्रांतील गावागावांचे मूळ रहिवासी आणि नवी मुंबईत राहणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे.  

सातारा जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असली की माथाडी कामगार मूळगावी धाव घेतात.  लोकसभेपेक्षा माथाडी कामगार विधानसभा निवडणुकीच्या वेळी जास्त प्रमाणात गावी जातात. यावेळी माथाडी नेत्याला उमेदवारी मिळाल्याने गावी जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असू शकते. यामुळे ठाणे, मावळच्या सर्व उमेदवारांना नक्कीच डोकेदुखी होऊ शकते.- नरेंद्र पाटील, सरचिटणीस, माथाडी युनियन

टॅग्स :satara-pcसाताराShashikant Shindeशशिकांत शिंदेlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४