शुद्ध पाण्यासाठी मोहीम

By Admin | Updated: June 3, 2016 02:03 IST2016-06-03T02:03:09+5:302016-06-03T02:03:09+5:30

अंगणवाड्यांमधील बालकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे यासाठी तेथील पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येणार आहे.

Campaign for pure water | शुद्ध पाण्यासाठी मोहीम

शुद्ध पाण्यासाठी मोहीम

आविष्कार देसाई,  अलिबाग
अंगणवाड्यांमधील बालकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे यासाठी तेथील पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना शुध्द पाणी मिळते की नाही हे समोर येणार आहे. तीन हजार २८३ अंगणवाड्यांमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागामार्फत उपविभागीय प्रगोगशाळेत पाठविण्याच्या सूचना पाणी व स्वच्छता विभागाने दिल्या आहेत. शुध्द पाणीपुरवठ्याबाबत रायगड जिल्हा परिषदेने मोहीम सुरू
के ली असल्याचे बोलले जात आहे.
सध्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे मिळेल त्या स्रोतातून पाणी घेतले जात आहे. हे स्रोत शुध्द आहेत की अशुध्द याची माहिती नागरिकांना नसते. त्यामुळे तेथे साथीच्या रोगांचा धोका संभवतो. तेथील ही पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे परीक्षण करण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत. जिल्ह्यातील असणाऱ्या स्रोतांची वेळोवेळी शुध्दता तपासणे गरजेचे आहे.
काही दिवसांनी पावसाळा सुरु होणार आहे. शाळा, अंगणवाड्या सुरु होतील. जिल्ह्यामध्ये तीन हजार २८३ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये एक लाख ६० हजार ३८१ शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालके आहेत. यासाठी तेथील अंगणवाड्यांना पिण्याच्या शुध्द पाण्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे. अशुध्द पाण्यामुळे तेथील बालकांना साथीचे आजार होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.
अंगणवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागासह ग्रामपंचायतींचा यामध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तालुकाअंगणवाड्या विद्यार्थी
अलिबाग२७३१२,८३१
कर्जत-११६६८,८२७
कर्जत-२१६९९,६८८
खालापूर२०३१०,८१५
महाड३१८१०,०४९
माणगाव३४२११,०४७
तळा११३२,५३२
म्हसळा१२८३,४४१
मुरुड११३४,८३५

---------
तालुकाअंगणवाड्या विद्यार्थी
पनवेल११८२१७,६९९
पनवेल२१८२१७,८२५
पेण२९८१३,५९९
रोहे२५३११,०७४
पोलादपूर१२७३,१६४
श्रीवर्धन१३६५,७७८
सुधागड१५७५,९९०
उरण१२३११,१८७
एकूण३,२८३१,६०,३८१

Web Title: Campaign for pure water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.