कॅडबरी-शास्त्रीनगरचा उड्डाणपूल गुंडाळला
By Admin | Updated: November 12, 2014 22:47 IST2014-11-12T22:47:10+5:302014-11-12T22:47:10+5:30
कॅडबरी ते शास्त्रीनगर मार्गावर 8क्क् मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा 13क् कोटींचा प्रस्ताव तिजोरीत पैसा नसल्याच्या कारणास्तव ठाणो महापालिकेने बासनात गुंडाळला आहे.

कॅडबरी-शास्त्रीनगरचा उड्डाणपूल गुंडाळला
ठाणो : वर्तकनगर, शिवाईनगर आणि पोखरण रोड येथील वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर कॅडबरी ते शास्त्रीनगर मार्गावर 8क्क् मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा 13क् कोटींचा प्रस्ताव तिजोरीत पैसा नसल्याच्या कारणास्तव ठाणो महापालिकेने बासनात गुंडाळला आहे.
विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी हा प्रस्ताव विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी शासनापुढे मंजूरीसाठी आणला होता. नितीन कंपनीकडून येणा:या उड्डाणपुलालाच तो जोडण्यात यावा, अशी मागणी केली होती. तसेच याच भागात 12क् फुटांचे रस्ते तयार करण्याचे प्रस्तावित केले होत़े त्यानुसार, पालिकेने ऑगस्ट महिन्यात अभ्यासही केला होता. परंतु, अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलाला छेद देऊन दुस:या उड्डाणपुलाची निर्मिती करणो शक्य नसल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले. तसेच पालिकेला या कामासाठी अधिकचा खर्च करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या पुलासाठी वेगळे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत पालिकेने व्यक्त केले होते.
विशेष म्हणजे, हा प्रस्ताव कागदावर असतानाही त्याचे श्रेय घेण्यासाठी पालिकेत राजकीय कलगीतुरा रंगला होता. परंतु, पालिकेने अद्यापही हा प्रस्ताव निधी नसल्याचे कारण पुढे करून महासभेसमोर सादर केलेला नाही. (प्रतिनिधी)
घोडबंदर रस्त्यावर वाहतूककोंडी झाली तर पर्यायी रस्ता म्हणून वर्तकनगर, गांधीनगरच्या रस्त्यांकडे बघितले जाते. कॅडबरी नाक्यावरून वर्तकनगरमार्गे पोखरण रस्त्याने टिकुजिनीवाडी, तुळशीधाम येथून वाहनांना बाहेर पडता येते. वर्तकनगर येथून लोकमान्यनगरकडेही जाता येते.
कॅडबरी नाका ते शास्त्रीनगर हा 12क् फूट रुंदीचा रस्ता शहर विकास आराखडय़ात प्रस्तावित आहे. मात्र, त्या रस्त्याचे पूर्णपणो रुंदीकरण होऊ शकले नाही. तो काही ठिकाणी 6क् ते 8क् फूट अस्तित्वात आहे. परंतु, आता महापालिका आयुक्तांनीच उड्डाणपुलाऐवजी या पर्यायी रस्त्याला पसंती दिल्याची माहिती पालिका सूत्रंनी दिली.
या ठिकाणी बाधित होणा:या कुटुंबांना कोलशेत येथे हलविण्यात येऊ शकते का, याची चाचपणीही सुरू झाली आहे. तसेच उड्डाणपुलापेक्षा या रस्त्याच्या कामाला खर्च कमी येणार असल्याने पालिका आता त्या अनुषंगाने विचार करीत असल्याचेही सूत्रंचे म्हणणो आहे. यामुळे हा उड्डाणपूल कागदावरून पुढे सरकण्याऐवजी पालिकेच्या दप्तरी जमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.