शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केबल कार वाहतूक व्यवस्था होणे अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:55 IST

Cable car transport: देशात वाढत्या शहरीकरणा सोबतच वाहनाच्या संख्येतही दिवसेंदिवस भर पडत आहे. नागरिकांना शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी तासंतास ट्रॅफिकमध्ये अडकून पाडाव लागत आहे.

- सुधीर बदामी(वाहतूक तज्ज्ञ) 

देशात वाढत्या शहरीकरणा सोबतच वाहनाच्या संख्येतही दिवसेंदिवस भर पडत आहे. नागरिकांना शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी तासंतास ट्रॅफिकमध्ये अडकून पाडाव लागत आहे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी केवळ राजकारणापुरती उरली असून, केबल कार आणि रोप वे सारखे प्रकल्प केवळ लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करणारे आहे. अशा खर्चिक आणि बडेजाव प्रकल्पांपेक्षा सुरू असलेल्या प्रकल्पांना चालना देणे गरजेचे आहे. रस्त्यांवरील गर्दीचे कारण पुढे करीत सरकार केबल कार आणि पॉड टॅक्सीसारखे प्रकल्प आणत असेल तर ती जनतेच्या पैशांची केवळ उधळण ठरणार आहे.

केबल कर सारखे प्रकल्प हे वाहतूक व्यवस्था बनविणे केवळ अशक्य असून, प्रामुख्याने तिचा वापर केवळ मनोरंजनात्मक किंवा हिल स्टेशन सारख्या उंच ठिकाणांपर्यंत पोहोचण्यासाठी केला जाऊ शकतो.  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केबल कार प्रकल्पाचा घाट घातला असला तरी तिला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बनविणे व्यवहार्य नाही. समुद्रकिनारा, एलिफंटा लेणी, गोराई, माथेरान हिल स्टेशन, बोरिवली नॅशनल पार्क आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य अशा ठिकाणांवर तिचा वापर करता येऊ शकतो. 

तसेच गिल्बर्ट हिल येथील मंदिर आणि पॅगोडा सारख्या आध्यात्मिक ठिकाणांचादेखील त्यात  समावेश करता येऊ शकतो. परंतु, तिचा एक शाश्वत वाहतूक व्यवस्था म्हणून विकास करणे म्हणजे समुद्र किनाऱ्यावर वाळूचा किल्ला बनविण्यासारखं ठरेल. या प्रकल्पासाठी करण्यात येणारा खर्च, तसेच त्याची देखभाल दुरुस्ती यावर होणार खर्च या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. 

केबल कारने मुंबई महानगर प्रदेशातील भागांना जोडताना इथले दमट वातावरण, देखभाल दुरुस्ती, संचलन खर्च आणि  सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक सबलता अशा गोष्टींचा विचारदेखील महत्त्वाचा ठरणार आहे. कारण लोकलने प्रवास करताना किमान पाच रुपयांचे तिकीटही न काढणारे बहुतेक लोक महागड्या रोपवेचा पर्याय अवलंबत का ? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. त्यामुळे रोपवे हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन बनने हे केवळ अशक्य आहे. त्याची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी असून, तसेच त्याच्या तिकिटाचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असणार आहेत. याचा उपयोग केवळ पर्यटनासाठी किंवा उंच टेकड्यांवर जाण्यासाठी होऊ शकतो. 

२०१९ एमएमआरडीएने रोपवे प्रकल्प बांधा, वापर आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर राबविण्यासाठी निविदादेखील काढली होती. यासाठी त्यावेळी दोन कंपन्यांनी सहभाग घेतला, परंतु एमएमआरडीएने प्राधान्याने सुरू असलेल्या इतर प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्याने प्रस्ताव रखडला होता. आता सरकारने या प्रकल्पात पुन्हा लक्ष दिल्याने याचा शहरात सुरू असलेल्या विकासकामांवर परिणाम होणे स्वाभाविक राहणार आहे. हा प्रकल्प जरी केंद्र आणि राज्य सरकारच्या किंवा सार्वजनिक खासगी भागीदारीतून राबविण्याचे प्रस्तावित केले असले तरीसुद्धा त्याच्या पूर्णत्वाची शाश्वती केवळ अशक्यच असणार आहे. 

 

टॅग्स :Mumbaiमुंबई