एनएमएमटीचा बस ट्रॅकर ॲप तात्पूरता बंद
By योगेश पिंगळे | Updated: December 15, 2023 17:59 IST2023-12-15T17:59:00+5:302023-12-15T17:59:27+5:30
महानगरपालिकेने सर्व्हर दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. सद्यस्थितीमध्ये प्रवाशांची होत असलेल्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

एनएमएमटीचा बस ट्रॅकर ॲप तात्पूरता बंद
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा बस ट्रॅकर ॲपमध्ये तांत्रीक समस्या निर्माण झाली आहे. यामुळे ॲप तात्पूरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. परिवहन उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेसाठी आईटीएमएस प्रणाली विकसीत केली आहे.
या प्रणालीमधील बसथांब्यावरील पीआयएसच्या माध्यमातून प्रवाशांना बसगाड्यांचे वेळापत्रक बसगाड्यांची बस थांब्यावर येण्याची वेळ, प्रवाशी बस पास व नुतणीकरण, मोबाईल तिकीटाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु सद्यस्थितीत डाटा सेंटर संपर्काची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही.
महानगरपालिकेने सर्व्हर दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. सद्यस्थितीमध्ये प्रवाशांची होत असलेल्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून दुरूस्तीचे काम पूर्ण होताच याविषयी माहिती पुन्हा नागरिकांपर्यंत प्रसारीत केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.