शाळांच्या सुरक्षेचा ज्वलंत प्रश्न

By Admin | Updated: November 14, 2014 01:53 IST2014-11-14T01:53:47+5:302014-11-14T01:53:47+5:30

मंत्रलयात लागलेल्या आगीनंतर अशा प्रकारच्या संकटापासून रक्षण करण्यासाठी अग्निशमन यंत्रणा बसवण्याच्या सूचना ठाणो महापालिकेने शाळांना दिल्या होत्या.

The burning question of school safety | शाळांच्या सुरक्षेचा ज्वलंत प्रश्न

शाळांच्या सुरक्षेचा ज्वलंत प्रश्न

राजू काळे ल्ल भाईंदर
मंत्रलयात लागलेल्या आगीनंतर अशा प्रकारच्या संकटापासून रक्षण करण्यासाठी अग्निशमन यंत्रणा बसवण्याच्या सूचना ठाणो महापालिकेने शाळांना दिल्या होत्या. मात्र याला दोन वर्षे उलटल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न करणा:या 75 शाळांना महापालिकेने पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावली होती, मात्र महापालिकेच्या या कागदी कारवाईला शाळा व्यवस्थापनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्याथ्र्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. 
अनेक शासकीय तसेच खासगी आस्थापनांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न कायम आहे. मंत्रलयातील दुर्घटनेनंतर शासकीय विभागांच्या ‘फायर ऑडिट’चा बंब सतत धावता असल्याचे भासवण्यात आले. मात्र हे सगळे कागदी घोडेच ठरले आहेत.  मीरा-भाईंदर पालिकेनेही आपल्या वास्तूत अग्निरोधक यंत्रणा नसल्याची जाणीव झाल्याने, ती बसविण्यास अलीकडेच सुरुवात केली आहे. तत्पूर्वी अग्निशमन दलाने शहरातील 289 शाळांची पाहणी केली असता त्यात महापालिकेच्या 35 शाळांसह 75 खाजगी शाळांत अग्निरोधक यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचे उजेडात आले होते. दरम्यान, काही महापालिका शाळांत फायर एक्सटिंग्विशर बसविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रंनी दिली. उर्वरित 75 शाळांना पालिकेने अग्निरोधक यंत्रणा बसविण्याबाबत सूचना करूनही त्यांच्या व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. 
1 ऑगस्ट रोजी पालिकेने त्या शाळांना पुन्हा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावली होती. त्यावरही अनास्था दाखवल्याचे निदर्शनास आले आहे. यावर प्रशासनाने गांभीर्य व्यक्त केले असून, त्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. शिवाय, शहरातील 222 गृहनिर्माण संस्था व 9 स्टुडिओतही अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आली नसल्याचे उजेडात आले आहे. त्यांनाही उपरोक्त कारवाईची नोटीस बजावली होती. त्यालाही केराची टोपली दाखविल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासन त्यावर कोणती कारवाई करणार, हे पाहावे लागणार आहे. 
 
अग्निशमन दलाचे प्रमुख व उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले की, ज्या शाळांत अग्निरोधक यंत्रणा बसविली नाही, अशा शाळांची नोंदणी रद्द करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय, ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2क्क्6’नुसार शाळा, गृहनिर्माण संस्था व स्टुडिओला करण्यात येणारा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. 

 

Web Title: The burning question of school safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.