नेरळमध्ये घरफोडीचे सत्र सुरूच
By Admin | Updated: June 1, 2016 02:47 IST2016-06-01T02:47:51+5:302016-06-01T02:47:51+5:30
येथे गेल्या अनेक महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नेरळमधील बंद घरांना लक्ष्य करून सोने-चांदीच्या व रोख रक्कम लंपास करण्याच्या घटना चार दिवसाआड घडत आहेत.

नेरळमध्ये घरफोडीचे सत्र सुरूच
नेरळ : येथे गेल्या अनेक महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नेरळमधील बंद घरांना लक्ष्य करून सोने-चांदीच्या व रोख रक्कम लंपास करण्याच्या घटना चार दिवसाआड घडत आहेत. सध्या सुटीचा हंगाम सुरू असल्याने तसेच लग्नसराईमुळे अनेक वस्त्यांमधील अनेक घरांतील कुटुंबे गावाला गेली आहेत. त्यामुळे अशी बंद असलेली घरे शोधून चोरटे डाव साधत आहेत. नेरळमध्ये अशाच घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नेरळमधील निर्माण नगरी येथे सोमवारी (३० मे) एका बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंयडा तोडून सुमारे ७ लाख ९ हजार ७५० रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. लग्नसराई व सुटीचा हंगाम असल्याने अनेक जण गावाला जातात. अशी बंद घरे हेरून चोरटे डाव साधत आहेत. अशा अनेक घरांमधून चोरट्यांनी लाखो रु पयांचा ऐवज लंपास करून धुमाकूळ घातला आहे. दिवसाआड अशा गुन्ह्यांची नोंद होत असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे. घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल झाले असताना अनेक गुन्ह्यांची उकल होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
११ मे रोजी नेरळपाडा येथे
चोरी झाली, त्यानंतर २० मे रोजी पुन्हा नेरळपाडा येथे चोरी झाली. त्यानंतर सोमवारी नेरळ निर्माण नगरी येथे एका बंद घराचा कडीकोंयडा तोडून ऐवज लंपास के ला. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल के ला आहे.