घरफोडी, फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
By Admin | Updated: March 6, 2016 02:00 IST2016-03-06T02:00:43+5:302016-03-06T02:00:43+5:30
जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गस्ती पथके, विशेष पथके कार्यरत करण्यात आली असली तरी गेल्या वर्षभरात गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे

घरफोडी, फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
जयंत धुळप, अलिबाग
जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गस्ती पथके, विशेष पथके कार्यरत करण्यात आली असली तरी गेल्या वर्षभरात गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चेन स्नॅचिंग, घरफोड्या, जमीन खरेदी-विक्रीत फसवणुकीबरोबरच महामार्गावर लुटमारीच्या घटनाही वाढल्या आहेत.
अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात गुरुवारी पतीचा खून करून पत्नीवर बलात्कार करणाऱ्या दोघा नराधमांना मांडवा सागरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. गुरुवारी रात्री अलिबागच्या वरसोली गावात खिडक्यांचे लॉक तोडून चोरट्यांनी घरातील सोने-चांदीचे दागिने, एक मोबाइल व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९५ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी रात्रीच केसतुली, नेरळ गावात चोरीच्या घटना घडल्या. रोहा रेल्वे स्टेशन ते रोहा बाजारपेठेतून जाताना नेरूळ येथील एका रहिवाशाची तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. महाडमध्ये तब्बल १ कोटी ३५ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.