घरफोडी करणारी टोळी गजाआड

By Admin | Updated: February 23, 2017 06:37 IST2017-02-23T06:37:34+5:302017-02-23T06:37:34+5:30

घरफोडी प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली

Burglary gang fleece | घरफोडी करणारी टोळी गजाआड

घरफोडी करणारी टोळी गजाआड

नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल झाली असून यामधील चार लाख रु पये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
तुर्भे एमआयडीसी परिसरात घरफोडीच्या घटना वाढत आहेत. अशा गुन्ह्यांची उकल करण्याच्या उद्देशाने सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्याला पोलिसांनी सुरवात केली आहे. त्याकरिता वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक उल्हास कदम, हवालदार दिगंबर झाले, सागर रसाळ, सोमनाथ वने यांचे पथक तयार करण्यात आले होते. यावेळी तपासादरम्यान त्यांना रामा विश्वनाथ काळे (२६) याच्याविषयी माहिती मिळाली. यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने सहा गुन्ह्यांची कबुली दिल्याचे निरीक्षक उल्हास कदम यांनी सांगितले. या गुन्ह्यातील चार लाख रुपये किमतीचा ऐवज त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. शिवाय परिसरातूनच चोरलेल्या तीन मोटारसायकली देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. काळे हा सराईत गुन्हेगार असून पोलीस त्याचा शोध घेत होते. (प्रतिनिधी )

Web Title: Burglary gang fleece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.