शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी अडीच लाख घरांवर फिरणार बुलडोझर, ‘एमएमआरडीए’ क्षेत्रात गृहनिर्मिती वेग घेणार 

By नारायण जाधव | Updated: August 24, 2024 08:20 IST

या बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी घरे निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिका, ‘झोपु’सह ‘एमएमआरडीए’ने अधिकाधिक प्रयत्न करण्याचे निर्देश गृह विभागाने दिले आहेत.

नवी मुंबई : विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसह मुंबई शहराचा विकास आराखडा राबविण्यासाठी मुंबईतील २ लाख ७० हजार कुटुंबे बाधित होणार आहेत. या बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी घरे निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिका, ‘झोपु’सह ‘एमएमआरडीए’ने अधिकाधिक प्रयत्न करण्याचे निर्देश गृह विभागाने दिले आहेत.

यामुळे मुंबई शहरासह ‘एमएमआरडीए’च्या अखत्यारितील ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, पनवेल, कल्याण-डोंबिवली या शहरांत प्रकल्पबाधितांसाठी गृहनिर्मितीचा वेग पकडण्याची चिन्हे आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या सदनिकांसाठी ऑनलाईन प्रणाली वापरण्याच्या सूचना केल्या आहेत.

बाधितांसाठी घरे नाहीतपायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ५० हजार कुटुंबे, मुंबई पालिकेचा विकास आराखडा राबविण्यासाठी दोन लाख कुटुंबांच्या घरादारांवर बुलडोझर चालवावा लागणार आहे. त्यात मेट्रो, रस्ते, मोनो, उड्डाणपूल, सागरी मार्गासह मुंबई पालिकेच्या विकास आराखड्यात प्रस्तावित केलेले डीपी आदी प्रकल्पांचा समावेश आहे. परंतु, यात बाधित होणाऱ्या कुटुंबांसाठी मोठ्या प्रमाणात मुंबईत कोठेच सदनिका उपलब्ध नाहीत. त्यामुळे नगरविकासच्या मदतीसाठी गृहनिर्माण विभागाने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सदनिका निर्मितीला वेग देण्याचे निर्देश मुंबई पालिका, ‘झोपु’सह ‘एमएमआरडीए’ला दिले. 

याप्रमाणे करावी कार्यवाहीn मुंबई पालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, एमएमआरडीए यांनी किमान पुढील १५ वर्षांत पुरेशा प्रमाणात प्रकल्पग्रस्त सदनिका निर्माण करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, जेणेकरून भविष्यात पायाभूत प्रकल्प उभा करण्यास विलंब होणार नाही.n संबंधित प्राधिकरणांनी पुढील ३ ते ५ वर्षांत किती प्रकल्पग्रस्त सदनिकांची गरज लागेल, किती सदनिका लागतील, याचा आढावा घ्यावा.n टीडीआर, अतिरिक्त चटई क्षेत्राची निर्मिती करून त्याचा याेग्य वापर करावा.n मुंबई पालिका, म्हाडा यांच्या अतिरिक्त सदनिकांचा प्रकल्पग्रस्तांसाठी वापर करावा.n एमएमआरडीए आणि मुंबई पालिकेने ‘झोपु’कडील सदनिका घाऊक प्रमाणात खरेदी कराव्यात.n शासकीय जमिनी, केंद्र सरकारच्या अखत्यारितील मिठागराच्या जागा, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनींवर प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका बांधण्यासाठी नगरविकास विभागाने पाठपुरावा करावा.n एमएमआरडीएच्या अखत्यारितील विविध प्राधिकरणांच्या मालकीच्या जागा एकत्रीकरणास विकासकास मुभा देऊन त्यांच्याकडून प्रकल्पग्रस्तांसाठीच्या सदनिका घ्याव्यात.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीए