मुंब्रा बायपासवर संरक्षक भिंत बांधा
By Admin | Updated: September 1, 2015 01:15 IST2015-09-01T01:15:54+5:302015-09-01T01:15:54+5:30
मुंब्रा बायपास रस्त्यावर होत असलेल्या अपघातांची दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्यावरील अपघातप्रवण ठिकाणी काँक्रि टची

मुंब्रा बायपासवर संरक्षक भिंत बांधा
डोंबिवली : मुंब्रा बायपास रस्त्यावर होत असलेल्या अपघातांची दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्यावरील अपघातप्रवण ठिकाणी काँक्रि टची संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्याचप्रमाणे खड्डे केवळ तात्पुरते न बुजवता तातडीने भूपृष्टीकरण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
मुंब्रा बायपास दुरु स्तीसंदर्भात यांनी सोमवारी मंत्रालयातील आपल्या दालनात संबंधित अधिकार्यांची बैठक आयोजित केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंते उल्हास डेबलवार आणि अधीक्षक अभियंते या बैठकीला उपस्थित होते. अवजड वाहने रस्ता सोडून उलटण्याचे काही प्रकार मुंब्रा बायपासवर घडले आहेत. त्याची दखल घेऊन यांनी या अपघाताच्या ठिकाणी काँक्रि टची संरक्षक भिंत बांधण्याचे काम त्विरत सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच, रस्ता दुभाजकाचीही अनेक ठिकाणी मोडतोड झाली असून दुभाजकांचे काम तातडीने हाती घेऊन त्यामध्ये झाडे लावण्याची निर्देश दिले. मुंब्रा बायपासवरील खड्डे तात्पुरते न बुजवता त्याचे भूपृष्ठीकरणाचे कामही तातडीने हाती घेण्याचे आदेश यांनी यावेळी दिले. मुंब्रा बायपासवरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे या रस्त्याची दुरु स्ती तातडीने हाती घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)