पालिकेच्या अर्थसंकल्पात साडेअकरा कोटींची वाढ

By Admin | Updated: February 24, 2016 03:13 IST2016-02-24T03:13:39+5:302016-02-24T03:13:39+5:30

महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या २0१६-१७ या आगामी अर्थसंकल्पात स्थायी समितीने ११ कोटी ५0 लाख रुपयांची वाढ सुचविली आहे. सोमवारी आणि मंगळवारी सदस्यांच्या

The budget of the corporation increased by a whopping amount of 4.5 crore | पालिकेच्या अर्थसंकल्पात साडेअकरा कोटींची वाढ

पालिकेच्या अर्थसंकल्पात साडेअकरा कोटींची वाढ

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या २0१६-१७ या आगामी अर्थसंकल्पात स्थायी समितीने ११ कोटी ५0 लाख रुपयांची वाढ सुचविली आहे. सोमवारी आणि मंगळवारी सदस्यांच्या सूचनांसह स्थायी समितीने वाढीव अर्थसंकल्पास मंजुरी दिली.
महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गेल्या आठवड्यात २0१५-१६ चा सुधारित आणि २0१६ -१७ चा १९७५.८५ कोटींचा मूळ वास्तववादी अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला होता. २२ आणि २३ फेब्रुवारी असे दोन दिवस या अर्थसंकल्पावर स्थायी समितीत चर्चा करण्यात आली.
जमेच्या बाजूत मालमत्ता करापासून ५८० कोटी अनुदानात पाच कोटी, महावितरणच्या विद्युतवाहिन्या भूमिगत करण्यासाठी दीड कोटी रुपयांचे अनुदान, जाहिरात परवान्यांतून दीड कोटी, नगररचना विकास शुल्कात साडेतीन कोटी अनुदान शुल्क, मालमत्ता करापासून पाच कोटी अशी एकूण साडेअकरा कोटींची वाढ दोन दिवसांच्या चर्चेतून सदस्यांनी सुचविली. त्याचप्रमाणे खर्चाच्या बाजूत शौचालयाची देखभाल दुरुस्ती व कचरा व्यवस्थापनासाठी ७ कोटी, भुयारी मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मूळ खर्चात ५० लाखांची वाढ, मोरबे धरणाची क्षमता वाढविण्यासाठी साडेपाच कोटी मूळ खर्चात वाढविण्याची शिफारस सदस्यांनी केली. (प्रतिनिधी)

सदस्यांनी मांडलेल्या सूचना व शिफारशींचा स्वीकारत करीत स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी २0१६-१७ साठी १९८७.३५ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली.

भारतरत्न अब्दुल कलाम यांचे स्मारक आणि शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
परिवहन समिती आणि वृक्ष प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पालाही स्थायी समितीने विनाचर्चा मंजुरी दिली.

अर्थसंकल्पावरील चर्चेकरिता स्थायी समितीतील १६ सदस्यांपैकी ६ सदस्य अनुपस्थित असून बहुतांश नगरसेवकांनी यावर चर्चा न केल्याचे पहायला मिळाले. उपस्थित १० नगरसेवकांनी अंदाजपत्रकावरील जमा-खर्चावर बोलण्यापेक्षा इतर प्रश्नांवर चर्चा करत सभेतील महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल दिल्याचे दिसून आले.

Web Title: The budget of the corporation increased by a whopping amount of 4.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.