भाऊचा धक्का-मोरा जलवाहतूक महागली
By Admin | Updated: December 9, 2014 02:47 IST2014-12-09T02:47:21+5:302014-12-09T02:47:21+5:30
भाऊचा धक्का-रेवस सागरी मार्गावर 5क् रुपयांवरून 65 अशी दरवाढ करण्यात आली आहे. मोरा सागरी मार्गावर 1क् रुपये तर रेवससाठी 15 रुपयांची दरवाढ केली आहे.

भाऊचा धक्का-मोरा जलवाहतूक महागली
उरण : भाऊचा धक्का-मोरा-रेवस या सागरी मार्गावरील तिकिटात नुकतीच भरमसाट वाढ करण्यात आली आहे. याआधी भाऊचा धक्का-मोरा सागरी मार्गावर 35 रुपयांवरून थेट 45 तर भाऊचा धक्का-रेवस सागरी मार्गावर 5क् रुपयांवरून 65 अशी दरवाढ करण्यात आली आहे. मोरा सागरी मार्गावर 1क् रुपये तर रेवससाठी 15 रुपयांची दरवाढ केली आहे.
प्रवाशांना या मार्गावर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. कामगारांना वेतनवाढ करण्यात आलेली नाही. अथवा इंधन दरवाढही झालेली नाही. तरीही दरात भरमसाट वाढ करण्यात आल्याने प्रवाशांचे कंबरडेच मोडले आहे.
या सागरी मार्गावरून दररोज हजारो प्रवासी आणि कामगार प्रवास करतात. याठिकाणी जेएनपीटी बंदराने व्यवसायासाठी येणा:या व्यापारी, आयात-निर्यातीच्या कामासाठी ये-जा करणा:या सीएचएसाठी मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया ते थेट जेएनपीटी बंदरार्पयत लाँच सेवा उपलब्ध करून दिली आहे. तर अलिबागमार्गे येणा:या प्रवाशांसाठी मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर लक्झरी सोयी-सुविधांसह स्पीड बोटींची जलदगती सेवाही उपलब्ध झाली आहे. शिवाय उरणकरांसाठी नियमित एनएमएमटीसी बससेवाही उपलब्ध झाली आहे. (वार्ताहर)
स्पीड बोटीची मागणी
मोरा सागरी मार्गावर दिवसभरासाठी 8 ते 9 लाँचेसच चालतात. मात्र तिकीट दरात वाढ करताना मालकवर्ग 13 प्रवासी बोटींचा खर्च दाखवत तिकीट दरवाढ पदरात पाडून घेतात. लाँचमालकांची मक्तेदारी मोडण्यासाठी या मार्गावर स्पीड बोटी चालविण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र शासनाने ती नाकारली. या प्रकाराकडे शिवसेनेचे शहरप्रमुख महेंद्र पाटील यांनी खासदार o्रीरंग बारणो यांच्याकडे लक्ष घालण्याची मागणी केली होती.