सिनेमा पाहण्यावरून भावावर हल्ला

By Admin | Updated: April 4, 2016 03:05 IST2016-04-04T03:05:24+5:302016-04-04T03:05:24+5:30

दारूच्या नशेत असलेल्या रेशन बुबेरा (२३) याने आपला मोठा भाऊ नितीन (२६) याच्यावर किरकोळ कारणावरून चाकूने वार केल्याची घटना कळव्याच्या खारीगाव भागात शनिवारी घडली

Brothers attack from watching movies | सिनेमा पाहण्यावरून भावावर हल्ला

सिनेमा पाहण्यावरून भावावर हल्ला

ठाणे : दारूच्या नशेत असलेल्या रेशन बुबेरा (२३) याने आपला मोठा भाऊ नितीन (२६) याच्यावर किरकोळ कारणावरून चाकूने वार केल्याची घटना कळव्याच्या खारीगाव भागात शनिवारी घडली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हल्लेखोर रेशन पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
खारीगावच्या ओम बडाराम अपार्टमेंटमध्ये हे दोघे राहतात. २ एप्रिलला नितीन त्याच्या मित्रांसह घरात रात्री १च्या सुमारास टीव्हीवर चित्रपट पाहत होता. त्या वेळी चित्रपटावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका पराकोटीला गेला की, रेशनने नितीनवर चाकूने वार केला. हल्ला करणारा रेशन पसार झाला. नितीनवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक एस. एम. धाडवे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Brothers attack from watching movies