तळोजा गावातील ब्रिटिशकालीन तलावाचे सुशोभीकरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:33 IST2021-02-20T23:33:12+5:302021-02-20T23:33:23+5:30
तळोजा येथील स्थानिक नगरसेवक अजीज पटेल, नगरसेवक हरेश केणी यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता.

तळोजा गावातील ब्रिटिशकालीन तलावाचे सुशोभीकरण होणार
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील टॅलोहा गावातील तलावाचे सुशोभीकरण करण्यास महासभेने मंजुरी दिली आहे. याकरिता ७ कोटी ५५ लाख ६३ हजार खर्च येणार आहे. तळोजा येथील हे तलाव ब्रिटिशकालीन आहे.
तळोजा येथील स्थानिक नगरसेवक अजीज पटेल, नगरसेवक हरेश केणी यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. महासभेत मंजुरी मिळाल्याने लवकरच या विकासकाचे ऑनलाईन टेंडर काढले जाणार आहे. त्यांनतर स्थायी समितीच्या मंजुरीने या विकासकामाला सुरुवात होणार आहे.
या तलावाच्या सुशोभीरणाच्या कामात गाळ काढणे, सुरक्षा भिंत, जॉगिंग ट्रक, कारंजे, लहान गार्डन, गणपती विसर्जन घाट, सभोवताली विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यामुळे तळोजे येथील या ऐतिहासिक वास्तूच्या शोभेत भर पडणार आहे. नगरसेवक अजीज पटेल यांनी महानगरपालिकेच्या स्थापनेपासून हा तलावाच्या सुशोभीकरणाकरिता प्रशासनसोबत पाठपुरावा केला होता.