सिद्धेश्वर गावाला जोडणारा पूल कोसळला
By Admin | Updated: March 12, 2016 02:06 IST2016-03-12T02:06:14+5:302016-03-12T02:06:14+5:30
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गाव व आदिवासीवाडीला जोडणारा पूल गेली दोन ते तीन वर्षांपासून पूर्णपणे ढासळला आहे. त्याला ठिकठिकाणी छिद्र पडले होते.

सिद्धेश्वर गावाला जोडणारा पूल कोसळला
पाली : सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गाव व आदिवासीवाडीला जोडणारा पूल गेली दोन ते तीन वर्षांपासून पूर्णपणे ढासळला आहे. त्याला ठिकठिकाणी छिद्र पडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या पुलासंदर्भात गाववाल्यांनी अनेकदा या विभागाकडे तक्र ारी व निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर हा धोकादायक पूल कोसळला. यामुळे सिद्धेश्वर गाव व आदिवासीवाडी यांचा पाली या शहराचा संपर्क तुटला आहे .
दहावी, बारावीच्या परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे हा पूल कोसळल्याने खूप हाल झाल्याचे या गावातील पालकांनी सांगितले. गेल्या कित्येक वर्षांपासून या पुलाची दुरु स्ती करण्यासाठी या गावातील ग्रामस्थांनी शासन दरबारी खेटे घालून देखील उपयोग न झाल्याने आता मात्र या सर्व गावाच्या वाहतुकीचा मुख्य मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. एवढी मोठी घटना होऊन देखील कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.