सिडकोत दलालांच्या मुक्तसंचाराला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:23 PM2019-12-14T23:23:13+5:302019-12-14T23:23:24+5:30

नवी मुंबई : सिडकोच्या प्रत्येक मजल्यावर सकाळपासून कार्यालय बंद होईपर्यंत मुक्तसंचार करणाऱ्या रिकामटेकड्या अभ्यंगतासह दलालांच्या टोळक्यांना प्रतिबंध घालण्याचा निर्णय ...

Break the free communication of brokers in CIDCO | सिडकोत दलालांच्या मुक्तसंचाराला ब्रेक

सिडकोत दलालांच्या मुक्तसंचाराला ब्रेक

Next

नवी मुंबई : सिडकोच्या प्रत्येक मजल्यावर सकाळपासून कार्यालय बंद होईपर्यंत मुक्तसंचार करणाऱ्या रिकामटेकड्या अभ्यंगतासह दलालांच्या टोळक्यांना प्रतिबंध घालण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार सिडकोच्या मुख्य दक्षता विभागाने या दृष्टीने ठोस कार्यवाही सुरू केली आहे. सिडकोभवनमध्ये प्रवेश करण्यासाठी आता सप्तरंगी प्रवेशिका घ्याव्या लागणार आहेत. सोमवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे सिडकोभवनमध्ये प्रवेश करण्यासाठी नागरिकांना मजल्यानुसार प्रवेशिका घ्याव्या लागणार आहेत. या प्रवेशिकांचे रंग मजल्यानुसार निश्चित करण्यात आले आहेत, त्यामुळे दिवसभर सिडको कार्यालयात तळ ठोकून बसणाºया दलालांना ब्रेक लागणार आहे.


श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे. मात्र, मागील काही वर्षांत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे सिडकोची पुरती नाचक्की झाली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून स्वतंत्र दक्षता विभाग स्थापन केला. या विभागाची जबाबदारी पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयावर सोपविण्यात आली. सध्या निसार तांबोळी हे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लाचखोरीच्या विविध प्रकरणांत सिडकोच्या तीन अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तर भ्रष्टाचाराच्या अनेक लहान-मोठ्या तक्रारी दक्षता विभागाकडे निवारणाच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात ९ डिसेंबरच्या ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत दक्षता विभागाने लाचखोरी व भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाºया घटकांना प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून सिडकोभवनमध्येजाताना प्रत्येक मजल्यानुसार प्रवेशिका घ्यावी लागणार आहे.

विशेष, म्हणजे सिडकोभवनच्या सात मजल्यांसाठी वेगवेगळ्या सात रंगांच्या प्रवेशिका तयार करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी ज्या रंगाची प्रवेशिका घेतली आहे, त्याच मजल्यावर त्यांना जाता येणार आहे. एखाद्याने पाचव्या मजल्याची प्रवेशिका घेतली असेल तर त्याला त्याच मजल्यावर जाता येईल. अन्य मजल्यावर जाण्यासाठी संबंधित नागरिकाला आधीच्या प्रवेशिकेवर विभागप्रमुखाची स्वाक्षरी घेऊन ती जमा करावी लागणार आहे. त्यानंतर पुढील इच्छित मजल्याची प्रवेशिका घ्यावी लागणार आहे. या प्रक्रियेमुळे सिडको कार्यालयात विनाकारण वेळ घालविणाºया अभ्यंगतासह इस्टेट एजेंट, बिल्डर्सचे प्रतिनिधी यांच्या मुक्तसंचाराला आळा बसणार आहे. दरम्यान, सिडकोत येणाºया नागरिकांना इच्छित विभाग व अधिकारी कोणत्या मजल्यावर आहे, याची माहिती नसते. त्यामुळे त्यांना एकापेक्षा अधिक मजले फिरावे लागते. नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी मजल्यानुसार प्रवेशिका ही योजना सुरू केल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. तसेच या योजनेमुळे कामात पारदर्शकता येऊन नागरिकांचे कामही सुलभपणे पार पडेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

मजल्यानुसार प्रवेशिकांचा रंग
सीबीडी येथील सात मजली इमारतीत सिडकोचे कार्यालय आहे. सोमवारपासून प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या प्रवेशिका घ्याव्या लागणार आहेत. पहिल्या मजल्यासाठी पिवळा, दुसºया मजल्यासाटी लाल तर तिसºया मजल्यासाठी निळ्या रंगाची प्रवेशिका दिली जाणार आहे. तसेच चौथ्या आणि पाचव्या मजल्यासाठी अनुक्रमे व्हॉयलेट व पांढºया रंगाची तर सहाव्या आणि सातव्या मजल्यासाठी गर्द निळा व हिरव्या रंगांची प्रवेशिका तयार करण्यात आली आहे.

Web Title: Break the free communication of brokers in CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको