दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: April 4, 2016 02:09 IST2016-04-04T02:09:27+5:302016-04-04T02:09:27+5:30

लोणावळा येथील सहारा सिटी रस्त्यावर भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने खोपोलीतील दोन तरु ण ठार झाल्याने खोपोली शहरावर शोककळा पसरली आहे

Both die in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

खोपोली : लोणावळा येथील सहारा सिटी रस्त्यावर भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने खोपोलीतील दोन तरु ण ठार झाल्याने खोपोली शहरावर शोककळा पसरली आहे. अपघातात ठार झालेल्या अविनाश सावंत (२४) याचा शनिवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर अविनाश व त्याचे मित्र लोणावळा येथील सहारा सिटी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटून संरक्षक भिंतीला धडक दिल्यानंतर दुचाकी खोल खड्ड्यात कोसळली. अपघातात ठार झालेला गुंजन (२४) हा शिळफाटा येथील व्यापारी प्रकाश रावळ यांचा मुलगा आहे.
अपघात इतका भयानक होता की, स्पोर्ट दुचाकीचे अनेक भागांत तुकडे झाले होते. अपघाताची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खंडाळा येथे शवविच्छेदन केल्यानंतर रविवारी दुपारनंतर या दोघांचे मृतदेह त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Both die in a two-wheeler accident