मांस वाहतूक प्रकरणी दोघांना अटक
By Admin | Updated: September 3, 2016 02:43 IST2016-09-03T02:43:37+5:302016-09-03T02:43:37+5:30
वाशी पोलिसांनी दीड टन मांस जप्त करून ते मुंबईच्या दिशेने घेवून जाणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हे मांस गाईचे असल्याची शक्यता असल्याने ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

मांस वाहतूक प्रकरणी दोघांना अटक
नवी मुंबई : वाशी पोलिसांनी दीड टन मांस जप्त करून ते मुंबईच्या दिशेने घेवून जाणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हे मांस गाईचे असल्याची शक्यता असल्याने ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
सायन-पनवेल मार्गाने मुंबईच्या दिशेने मांस नेले जाणार असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी मांस घेवून जाणारी बोलोरो जीप पोलिसांच्या हाती लागली. त्यामध्ये प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये ठेवलेले सुमारे दीड टन मांस होते. हे मांस गाईचे असल्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी ते तपासणीसाठी पाठवले आहे. (प्रतिनिधी)