टिटवाळ्यात सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह
By Admin | Updated: July 21, 2016 18:40 IST2016-07-21T18:40:24+5:302016-07-21T18:40:24+5:30
येथील रेल्वे स्थानकाच्या आरपीएफ चौकी व फाटका दरम्यान असणाऱ्या रेल्वे कॉलनीच्या मागे रेल्वे पटरीच्या गटारात अंदाजे 25 वय असणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळून आला

टिटवाळ्यात सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह
टिटवाळा:- येथील रेल्वे स्थानकाच्या आरपीएफ चौकी व फाटका दरम्यान असणाऱ्या रेल्वे कॉलनीच्या मागे रेल्वे पटरीच्या गटारात अंदाजे 25 वय असणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, सकाळी कुणीतरी अज्ञात व्यक्तीच्या ही बाब निदर्शनास आली की कुणातरी महिलेचा मृतदेह रेल्वे पटरीच्या गटारात पडाला आहे. याची खबर टिटवाळा आरपीएफला मिळताच घटनास्थळी पोहोचले. सदर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर महिलेचे वय अंदाजे 25 च्या आसपास असावे. सदर महिलेच्या अंगावर गाऊन परिधान केलेला होता. यावरून सदर महिला ही टिटवाळा परिसरातीलच असावी असा तर्क रेल्वे पोलिसांनी लावला आहे. सदर महिलेचा खून की आत्महत्या झाली असावी अशा तर्क वितर्काना उधाण आले आहे. रेल्वे पोलिसांनी सदर अज्ञात महिलेचा मृतदेह शवविच्छेदना करिता कल्याण येथील रूक्मीणीबाई रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. सदर महिलेचा खून की आत्महत्या हे शवविच्छेदन झाल्यावरच समजेल. अद्याप सदर महिलेची ओळख पटली नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.