तरूणींना वाचवताना बुडालेल्या रमेश वाळुंजचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: January 11, 2016 18:51 IST2016-01-11T16:40:03+5:302016-01-11T18:51:26+5:30
वांद्रे बँडस्टँड येथे सेल्फी काढताना समुद्रात पडलेल्या मुलींचा जीव वाचवताना वहानू गेलेल्या रमेश वाळुंज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह मिठी नदीच्या किना-यावर सापडला

तरूणींना वाचवताना बुडालेल्या रमेश वाळुंजचा मृतदेह सापडला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - वांद्रे बँडस्टँड येथे सेल्फी काढताना समुद्रात पडलेल्या मुलींचा जीव वाचवताना वहानू गेलेल्या रमेश वाळुंज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह धारावीत मिठी नदीच्या किना-यावर सापडला आहे. तब्बल दोन दिवसांनंतर त्यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
शनिवारी दुपारी काही तरूणी बँडस्टँडच्या किल्ल्यावरून सेल्फी काढत असताना एका तरूणीचा पाय घसरला आणि तिला सावरताना तिच्या दोन मैत्रिणीही समुद्रात पडल्या. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्या रमेश वाळंज यांनी त्या मुलींना वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली. त्यांनी दोन तरूणा
वांद्रे येथील बॅण्डस्टँड येथे शनिवारी सकाळी फिरायला गेलेल्या तरन्नुम अन्सारी, अंजुम खान आणि मुश्तरी खान या तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडाल्या. रमेश वळुंज या तरुणाने जिवाची पर्वा न करता अंजुम आणि मुश्तरीचे प्राण वाचवले. समुद्रात गेलेल्या तरुन्नुमला वाचविण्याच्या प्रयत्नात तो तिच्यासह लाटेच्या प्रवाहात दिसेनासा झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, तटरक्षक दलाकडून जोमाने शोधकार्य सुरू करण्यात आले. अखेर आज सकाळी ७ च्या सुमारास वळुंज यांचा मृतदेह सापडला.