हरवलेल्या तरु णाचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: December 14, 2015 01:27 IST2015-12-14T01:27:39+5:302015-12-14T01:27:39+5:30
शिक्षणासाठी हैदराबाद येथून मुंबई पवई येथे आयएटीबीटेक करणारा २९ वर्षांचा तरु ण कर्जत तालुक्यातील ढाक येथे ट्रेकिंग करण्यासाठी आला होता.

हरवलेल्या तरु णाचा मृतदेह सापडला
कर्जत : शिक्षणासाठी हैदराबाद येथून मुंबई पवई येथे आयएटीबीटेक करणारा २९ वर्षांचा तरु ण कर्जत तालुक्यातील ढाक येथे ट्रेकिंग करण्यासाठी आला होता. मात्र फिरता फिरता तो हरवला ४५ दिवसांनी त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे.
मुंबई पवई येथे बी - टेक करणारा श्रीनिवास चंद्रशेखर भोगराजी (२९) मुंबई येथून २५ आॅक्टोबरला निघाला होता. मात्र तो कुठे गेला आहे याची माहिती कोणालाच नव्हती. वडील हैद्राबाद येथे राहत असल्याने ते नेहमी त्याच्याशी मोबाइलवर बोलता असत मात्र २५ आॅक्टोबरपासून त्याचा फोन लागत नाही त्यांच्याशी संपर्क होता नाही म्हणून त्याचे वडील हैद्राबाद वरून मुंबईमध्ये आले. त्यांनी त्यांच्या मोबाइल नंबरचे लोकेशन काढले असता २५ आॅक्टोबरला त्याच्या मोबाइलचे लोकेशन कर्जत तालुक्यात दाखवले. त्यानुसार त्याचे वडील चंद्रशेखर भोगराजी यांनी आपला मुलगा श्रीनिवास हरवला आहे अशी तक्र ार कर्जत पोलीस ठाण्यात ३० आॅक्टोबरला नोंदविली. श्रीनिवासला ट्रेकिंगची आवड होती असेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे कर्जत तालुक्यात ट्रेकिंगसाठी प्रसिध्द असलेल्या जागांवर त्या गावातील नागरिक, पोलीस पाटील यांच्या मदतीने पोलिसांनी तपास गेला मात्र श्रीनिवासचा शोध काही पोलिसांना लागला नाही. ११ डिसेंबरला सांडशी गावातील ग्रामस्थांकडून कर्जत पोलीस ठाण्याला कळविण्यात आले की सांडशी गावाच्या डोंगरावर एक मृतदेह आहे, त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला, त्या मृतदेहाजवळ मोबाइल, पॉकेट, बॅग, इअर फोन आदी सामान सापडले. पोलिसांनी ते तपासले असता दीड महिन्यापूर्वी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती त्या श्रीनिवासचा मृतदेह असल्याची खात्री पटली.
सांडशी व माणगाव ग्रामस्थांच्या मदतीने त्या उंच कड्यावर असलेला मृतदेह खाली आणण्यात आला. त्या नंतर तो मृतदेह कर्जतच्या उपजिल्हा
रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. (वार्ताहर)