शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

वाशीत उलगडला त्रिपुरातील रक्तरंजित संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 07:02 IST

विचारधारांच्या संघर्षात आपला गड राखून ठेवण्यासाठी क्रूरतेच्या परमोच्च बिंदूवर विराजमान असलेल्या कम्युनिस्टांच्या गडाला त्रिपुरात खिंडार पाडणाऱ्या भाजपाचे सुनील देवधर (प्रभारी-त्रिपुरा) यांनी वाशीतील मॉडर्न कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात त्रिपुरातील रक्तरंजित संघर्षाचा उलगडा केला.

नवी मुंबई  - विचारधारांच्या संघर्षात आपला गड राखून ठेवण्यासाठी क्रूरतेच्या परमोच्च बिंदूवर विराजमान असलेल्या कम्युनिस्टांच्या गडाला त्रिपुरात खिंडार पाडणाऱ्या भाजपाचे सुनील देवधर (प्रभारी-त्रिपुरा) यांनी वाशीतील मॉडर्न कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात त्रिपुरातील रक्तरंजित संघर्षाचा उलगडा केला.देशभरात असहिष्णुतेचे काहूर माजवणारे कम्युनिस्ट स्वत: आपल्या राज्यात किती असहिष्णू आणि हिंसक असतात, याचा पाढाच त्यांनी वाचला आणि अंगावर काटा येतील, असे कम्युनिस्ट हिंसाचाराचे अनेक प्रसंग त्यांनी वर्णन केले. गरिबांची गरिबी कायम राहील याची तजवीज करणे, त्रिपुराला बाह्य जगाशी अलिप्त ठेवून विकासाचे वारेही इथे फिरकू न देणे आणि विरोधकांचे हिंसाचाराने दमन करणे, या त्रिसूत्रीवर हे प्रशासन टिकून असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रातून जाऊन त्रिपुरासारख्या राज्यात संघटन उभारणे आणि लोकशाही मार्गाने अपेक्षित परिणामांपर्यंत ते घेऊन जाणे, हे सगळेच अचंबित करणारे असून, त्यामुळे या ठिकाणी कम्युनिस्टांवर केलेली मात सुखावणारी असल्याचे सांगतले. उपस्थितांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. अंत्योदय प्रतिष्ठान व सर्व समाज ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या वेळी अंत्योदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश निकम, नरेंद्र कुमार, शंकर गायकर, सर्व समाज ट्रस्टचे उदयवीर सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :BJPभाजपाTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018