शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
2
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
3
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
4
अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
6
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?
7
भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे तर...
8
सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता, सतर्क राहा, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र
9
अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दिला महागाईचा झटका; दुधाच्या दरात केली वाढ
10
पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी स्थानकात तांत्रिक बिघाड
11
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
12
PHOTOS : शुबमन आणि रिद्धिमा लग्न करणार? अभिनेत्रीनं सोडलं मौन, तिचं धक्कादायक उत्तर
13
“अब की बार फिर मोदी सरकार”; भारतातील लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll वर चीनची प्रतिक्रिया
14
PM Modi PSU Stocks : कोणी १०% वाढला... तर कोणी केला रकॉर्ड; PM Modiनी सांगितलेले शेअर्स बनले रॉकेट
15
महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा
16
T20 World Cup 2024: क्रिकेटला पुन्हा ग्लॅमरचा तडका! आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली 'महाराष्ट्राची लेक'
17
एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...
18
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
19
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
20
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी

पनवेलमध्ये भाजपचे सर्वाधिक सरपंच, उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 1:46 AM

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका : पालीदेवदमध्ये मिळाली १३ मते, शेकापचे मत फुटल्याने खळबळ

पनवेल : जानेवारी महिन्यात विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यात पनवेल तालुक्यात घवघवीत यश संपादन करीत तालुक्यात भाजपचे सर्वाधिक सरपंच ,उसरपंच विराजमान झाले आहेत.         पनवेल तालुक्यातील पालीदेवद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगिता पाटील, उपसरपंचपदी अशोक पाटील निवडून आले. या ग्रामपंचायतीत १२ सदस्य भाजपचे असताना १३ मते त्यांना मिळाली. त्यामुळे शेकापचे एक मत फुटून तो भाजपला मिळाला. त्यामुळे शेकापच्या गोटात मोठी खळबळ माजली. वाजे, खैरवाडी, केवाळे, उमरोली, आकुर्ली, सावळे, वारदोली ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच निवडणूक बिनविरोध झाली.  वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंजली भालेकर, उपसरपंचपदी रेवण पाटील, खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयश्री दिसले, उपसरपंचपदी बाळाराम पाटील, आकुर्ली सरपंचपदी भारती पाटील, उपसरपंचपदी सत्यवान धरणेकर, उमरोली सरपंचपदी कमला मढवी, उपसरपंचपदी रोशन पोपेटा, वारदोली सरपंचपदी संगीता भूतांबरा, उपसरपंचपदी सविता पाटील, केवाळे  सरपंचपदी रेणुका गायकर, उपसरपंचपदी कांचन पालकर, वाकडी सरपंचपदी कुंदा पवार, उपसरपंचपदी अरुण पाटील, खैरवाडी सरपंचपदी रजनी ढुमणे, उपसरपंचपदी हनुमान खैर,  सावळे सरपंचपदी प्रशांत माळी, उपसरपंचपदी कांता कांबळे, देवळोली सरपंचपदी काजल  पाटील, पोसरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भावना जोशी, तर उपसरपंचपदी सतीश पाटील विराजमान झाले आहेत.  या सर्व विजयी सरपंच, उपसरपंच शिलेदारांचे माजी खासदार  रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी अभिनंदन केले. भाजपने सर्वाधिक जागांवर दावा केला असला तरी महाविकास आघाडीच्या वतीने किती ग्रामपंचायतींवर विराजमान झाले आहेत ही माहिती स्पष्ट झालेली नाही. तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका शांततेत पार पडल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले.उरणमध्ये चार ग्रामपंचायतींमध्ये महाआघाडीचे सरपंच आघाडीवरउरण : उरण तालुक्यातील बुधवारी झालेल्या चारही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत महाआघाडीने बाजी मारली आहे. तालुक्यातील सहापैकी चार ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या. केगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नंदकुमार पाटील तर उपसरपंचपदी चिंतामण पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. म्हातवली  ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाआघाडीच्या रंजना पाटील यांची तर उपसरपंचपदी  पल्लवी म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तालुक्यात सर्वात मोठ्या चाणजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी  मंगेश थळी  तर उपसरपंचपदी  अशोक कोळी यांची निवड झाली आहे. एकमेव फुंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदाच्या निवडणुकीत महाआघाडीचे सागर घरत ७ विरुद्ध २ मतांनी निवडून आले आहेत, तर उपसरपंचपदी चंद्रकांत म्हात्रे यांची निवड झाली आहे. नागाव आणि वेश्वी या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या जाहीर झालेल्या चुकीच्या आरक्षणावर याआधीच आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती उरण तहसील कार्यालयातून देण्यात आली. शेकाप, सेनेची भाजपशी हातमिळवणी म्हातवली आणि चाणजे ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेक करणारे सेना- भाजप चाणजे ग्रामपंचायतीमध्ये तर शेकाप-भाजप म्हातवली ग्रामपंचायतीत एकत्र आले आहेत. त्यामुळेच या दोन्ही ग्रामपंचायतीची उपसरपंचपदे भाजपला मिळाली असल्याचे सांगितले जात आहे.यांची झाली  बिनविरोध निवड  केगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नंदकुमार पाटील तर उपसरपंचपदी चिंतामण पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. म्हातवली  ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाआघाडीच्या रंजना पाटील यांची तर उपसरपंचपदी  पल्लवी म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

टॅग्स :BJPभाजपा