भाजपाच्या ५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By Admin | Updated: May 6, 2017 06:31 IST2017-05-06T06:31:47+5:302017-05-06T06:31:47+5:30

महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना खारघरमधील तब्बल ५० भाजपा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले

BJP's 50 office bearers resign | भाजपाच्या ५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

भाजपाच्या ५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना खारघरमधील तब्बल ५० भाजपा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे, शेवटपर्यंत पदाधिकाऱ्यांना ताटकळत ठेवल्याने हे राजीनामे देण्यात आले आहेत. राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपाचे जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील, तालुका खजिनदार अनंता तोडेकर व रामशेठ ठाकूर यांचे कट्टर समर्थक सुरेश ठाकूर यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता काही तास शिल्लक असताना भाजपामध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे राजीनामे पाठविले आहेत. पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करू असे, सुरेश ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी सेना, शेकाप जोरदार प्रयत्न करीत आहे.
राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये महिला मोर्चाच्या कुंदा मेंगडे, राजेंद्र मांजरेकर, दत्ता तांबोळी, सुनीता मुळीक, संतोष शर्मा, लखवीर सैनी आदी पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

Web Title: BJP's 50 office bearers resign