राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय; नवी मुंबईत भाजपकडून जल्लोष
By कमलाकर कांबळे | Updated: December 3, 2023 20:12 IST2023-12-03T20:08:44+5:302023-12-03T20:12:03+5:30
यावेळी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय; नवी मुंबईत भाजपकडून जल्लोष
नवी मुंबई: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाबद्दल नवी मुंबई भाजपकडून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या. एकमेकांना मिठाई वाटून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विरोधकांना चारी मुंड्या चित केल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
भाजपाच्या या विजयामुळे जनतेचा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली या देशाचा यापुढेही विकास व्हावा, हाच कौल जनतेने या निवडणूक निकालामध्ये दिल्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी म्हटले आहे.