शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'मेगाभरती' करणाऱ्या भाजपाला गळती; नगरसेवक घेताहेत अजितदादांच्या भेटीगाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 13:41 IST

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे.

नवी मुंबई- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. गत आठवड्यात पाच नगरसेवकांनी शिवसेनेत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गुरुवारी सकाळी 8 वाजता तीन विद्यमान नगरसेविका व चार माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या सोबत भाजपामध्ये गेलेल्या नगरसेविका शुभांगी पाटील, शशिकला पाटील व सलूजा सुतार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक संदीप सुतार, राजू शिंदे, चंद्रकांत पाटील, विवेक पाटील ही उपस्थित होते. यामुळे भाजपला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने कोपरखैरणेमधील एक विद्यमान नगरसेवक व माजी नगरसेविकाही लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली. मागील आठवड्यात तुर्भेमधील कट्टर नाईक समर्थक म्हणून आतापर्यंत ओळखल्या जाणा-या सुरेश कुलकर्णी यांनी पाच नगरसेवकांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कुलकर्णी समर्थक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले असून  हे सर्व नगरसेवक लवकरच नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहेत. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीचे 48 नगरसेवक घेऊन भाजपामध्ये प्रवेश केला. ऐरोली व बेलापूर मतदारसंघाची उमेदवारी नाईक परिवारास मिळेल, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात ऐरोली हा एकच मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्यात आला. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांची हॅट्ट्रीकची संधी हुकली. निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपाचे अनेक नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू लागले आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई