शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

भाजपा नगरसेवकाच्या घरातच अद्याप वीज नाही, ‘मी लाभार्थी’चा विरोधाभास, आदिवासीवाडी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 4:52 AM

भाजपाची ‘मी लाभार्थी’ जाहिरात सध्या सर्वत्र झळकत आहे. सरकारी योजनेचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला कशाप्रकारे मिळाला आहे, याची माहिती या जाहिरातीतून देण्यात येत आहे.

- वैभव गायकर

पनवेल : भाजपाची ‘मी लाभार्थी’ जाहिरात सध्या सर्वत्र झळकत आहे. सरकारी योजनेचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला कशाप्रकारे मिळाला आहे, याची माहिती या जाहिरातीतून देण्यात येत आहे. मात्र, पनवेल महापालिकेतील एका आदिवासी नगरसेवकाच्या घरात अद्याप वीज पोहोचली नसल्याने भाजपाच्या ‘मी लाभार्थी’ जाहिरातीचा विरोधाभास दिसून येत आहे. महादेव मधे, असे या नगरसेवकाचे नाव असून यासंदर्भात पनवेलच्या सर्वसाधारण महासभेत शनिवारी प्रश्न उपस्थित करण्यात आला.महादेव मधे हे पनवेल महापालिकेच्या प्रभाग ९मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. पनवेल तालुक्यातील टेंभोडे परिसरात वार्घ्याची वाडी आणि सागवाडी या दोन आदिवासी वाड्या आहेत. यापैकी वार्घ्याच्या वाडीत महादेव मधे हे कुटुंबासमवेत राहतात. मात्र, देशाच्या स्वातंत्र्याला ६९ वर्षे झाली असतानाही पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आदिवासीवाडीत अद्याप वीज पोहोचलेली नाही.महापालिकेत निवडून आले, तरी महादेव यांच्या गावात वीज पोहोचली नसल्याने त्यांना कायम स्थानिक रहिवाशांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेकडे मागील दोन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनामार्फत चालढकल केली जात असल्याचा आरोप मधे यांनी महासभेत केला आहे. विशेष म्हणजे, राज्यभर भाजपा आपल्या विकासकामांचा ढोल पिटत असताना, खुद्द भाजपा नगरसेवकाचे गाव अंधारात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यावर वार्घ्याच्या वाडीपर्यंत वीजपुरवठा देण्यासंदर्भात काम सुरू असून टेंडर प्रक्रि या सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगरसेवकाच्या घरापर्यंत वीजपुरवठा पोहोचला नसेल, तर इतरांचे काय? असाही प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला.- पनवेल महापालिकेच्या सभागृहात सर्वच नगरसेवकांनी महादेव मधे यांची बाजू घेत, प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पनवेल तालुक्यात अनेक आदिवासीपाड्यांचा समावेश आहे. मात्र, नगरसेवक महादेव मधे यांनी आदिवासीपाड्यातील मुद्दा उपस्थित केल्याने तालुक्यातील सर्वच आदिवासीवाड्यांचा विषय ऐरणीवर आला आहे.आमच्या आदिवासीवाडीत कित्येक वर्षे वीज पोहोचलेली नाही. मी नगरसेवक असल्याने माझ्या प्रभागातील रहिवाशांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने लोकांशी चर्चा करण्यास गेलो असता, ‘ते आधी तुझ्या घरात वीजजोडणी घे, नंतर आमच्या समस्या सोडव’, असा प्रतिप्रश्न करतात. याबाबत महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाºयांनाही वारंवार कळवले आहे. मात्र, तरीही अद्याप आदिवासीवाडी वीजपुरवठा झालेला नाही.- महादेव मधे, नगरसेवक, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई