कळंबोलीत भाजपाचे उमेदवार निवडून आणणार - शेवाळे

By Admin | Updated: May 10, 2017 00:26 IST2017-05-10T00:26:36+5:302017-05-10T00:26:36+5:30

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपाने रामदास शेवाळे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर कळंबोलीच्या १० (क) या प्रभागाची जबाबदारी सोपवली आहे.

BJP candidate from Kalamboli will be elected - Shewale | कळंबोलीत भाजपाचे उमेदवार निवडून आणणार - शेवाळे

कळंबोलीत भाजपाचे उमेदवार निवडून आणणार - शेवाळे

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोजा : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपाने रामदास शेवाळे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर कळंबोलीच्या १० (क) या प्रभागाची जबाबदारी सोपवली आहे. कळंबोलीतील ७, ८, ९, १० या प्रभागांतील सर्वच उमेदवार संपूर्ण ताकदीनिशी निवडून आणणार, असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे रामदास शेवाळे भाजपासाठी किंगमेकर ठरणार असल्याची जोरदार चर्चा परिसरात आहे.
राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप महाआघाडीतून बाहेर पडलेल्या शेवाळेंमुळे कळंबोली भाजपाला नवा चेहरा मिळाला असून येथील पक्षाची ताकद वाढली आहे. शहरातील विविध समस्यांवर आवाज उठवून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेवाळे यांनी जाहीर केले असून आपल्या उमेदवारांच्या प्रचारावर ते जातीने लक्ष देत आहेत. कळंबोली प्रभागात भाजपाला शेकाप व राष्ट्रवादीच्या दिग्गज उमेदवारांशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. रामदास शेवाळे शेकापच्या रवींद्र भगत यांच्याविरोधात लढणार आहेत.

Web Title: BJP candidate from Kalamboli will be elected - Shewale