‘बिनधास्त’ साहित्यिक गेला
By Admin | Updated: December 11, 2014 02:32 IST2014-12-11T02:32:32+5:302014-12-11T02:32:32+5:30
उभयान्वयी अव्यय’, ‘बिनधास्त’, ‘विषयांतर’ अशा साहित्यकृतींनी वाचकांचे भावविश्व ढवळून काढणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झाले.

‘बिनधास्त’ साहित्यिक गेला
मुंबई : ‘उभयान्वयी अव्यय’, ‘बिनधास्त’, ‘विषयांतर’ अशा साहित्यकृतींनी वाचकांचे भावविश्व ढवळून काढणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांचे ज्येष्ठ बंधू विनायक, पुतण्या अमित रवींद्र असा परिवार आहे.
चिंचपोकळी येथील साने गुरुजी मार्गावरील साई मंदिरात बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. मराठी साहित्याला सोवळ्यातून बाहेर काढणारी जी काही बंडखोर नावे आहेत त्यात चंद्रकांत खोत यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. स्वामी विवेकानंद, गजानन महाराज, साईबाबा यासारख्या संत-योगी पुरुषांची चरित्रे लिहिणा:या खोत यांनी लैंगिक विषयावरील कादंब:याही लिहिल्या आणि त्या तुफान गाजल्या. (प्रतिनिधी)
खोत यांच्या वैशिष्टय़पूर्ण लेखनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. खोत यांनी ‘यशोदा’ या मराठी चित्रपटासाठी गीतलेखन केले होते. 1969 मध्ये त्यांचा ‘मर्तिक’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यासोबतच 1984 साली त्यांचा ‘अबकडइ’चा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.