भोकरे यांची उचलबांगडी

By Admin | Updated: March 4, 2016 01:55 IST2016-03-04T01:55:15+5:302016-03-04T01:55:15+5:30

शामकांत भोकरे यांची पक्षप्रतोद पदावरून पक्ष नेतृत्वाने तडकाफडकी उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली सावंत यांची वर्णी लावली आहे.

Bhokre's pickle bolt | भोकरे यांची उचलबांगडी

भोकरे यांची उचलबांगडी

अलिबाग : शामकांत भोकरे यांची पक्षप्रतोद पदावरून पक्ष नेतृत्वाने तडकाफडकी उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली सावंत यांची वर्णी लावली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने नवीन घडत असल्याने जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची स्वप्न शामकांत भोकरे यांना गेल्या तीन महिन्यांपासून पडत आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे अध्यक्षपदासाठी आपलीच निवड करणार अशा अविर्भावात भोकरे होते. परंतु पक्ष नेतृत्वाकडून कोणतीच हालचाल होत नसल्याचे पाहून भोकरे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी सुतारवाडीच्या बैठकीत काही प्रमाणात आपली नाराजी प्रकट केली होती. अध्यक्षपद मिळणार नाही याची खात्री पटल्यावर भोकरे यांनी पक्ष नेतृत्वालाच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आव्हान दिले. कोण्या नेत्यामुळे मी जिल्हा परिषदेचा सदस्य झालेलो नाही, तटकरेंच्या अशा वागण्याने एकदिवस जिल्ह्यात ते एकटेत पक्षात राहतील, असे वक्तव्य केले होते. भोकरे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी विरोधकांच्या सोबत सत्ताधाऱ्यांवरच शरसंधान साधले. सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणारे विषय सभागृहात काढून त्यांनी विरोधकांच्या दंडात बळ देण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे त्यांनी सभागृहाचे आणि पक्षाचे सर्वेसर्वा सुनील तटकरे यांची कमालीची नाराजी ओढावून घेतली. सर्वसाधारण सभेनंतर जिल्ह्याच्या राजकारणात बदल होणार यांचे संकेत प्राप्त झाले होते. दस्तुरखुद्द भोकरे यांनी सांगितले होते की, पक्षप्रतोद पदावर आता मला पाणी सोडावे लागणार. त्याचप्रमाणे भोकरे यांच्याकडील पक्षप्रतोद पद आता काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी महिला सदस्य असलेल्या वैशाली सावंत यांची वर्णी लागली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bhokre's pickle bolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.