शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

विसर्जनासाठी चोख बंदोबस्त

By admin | Updated: September 26, 2015 23:15 IST

दहा दिवसांच्या लाडक्या बाप्पाला रविवारी निरोप देण्यात येणार असल्याने जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

अलिबाग : दहा दिवसांच्या लाडक्या बाप्पाला रविवारी निरोप देण्यात येणार असल्याने जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी एक हजार ५४१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.जिल्ह्यात १४३ सार्वजनिक आणि १७ हजार ४०१ घरगुती गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. अलिबागच्या समुद्रकिनारी लाइट, तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी अलिबाग नगर पालिकेकडून निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहे. १६ जुलै ते १५ सप्टेंबर २०१५ या कालावधीत रायगड पोलिसांनी एक हजार ४७० सीआरपीसीप्रमाणे कारवाई केली आहे. मुंबई पोलीस अ‍ॅक्ट नुसार ४३, तर दारुबंदी कलमान्वये २८ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रायगड पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांनी लोकमतला सांगितले.-------विसर्जन केंद्र नसतानाही मुंबईची गर्दीनवी मुंबई : वाशी खाडीपुलाखाली होणारे विसर्जन धोक्याचे ठरत आहे. शुक्रवारी रात्री विसर्जनासाठी आलेली एक व्यक्ती वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी बंदी केल्यानंतरही मुंबईतून विसर्जनासाठी गणेशमूर्ती येत असल्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.मानखुर्द परिसरातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी वाशी खाडीपुलाखाली येत असल्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. खाडीपुलाच्या मानखुर्द हद्दीच्या भागात परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र वाशीकडील खाडीच्या भागात पुरेशी सोय नसल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी विसर्जनावर बंदी आणलेली आहे. केवळ मच्छीमार बांधवांचा हा नेहमीचा मार्ग असल्याने त्यांच्याच घरगुती गणेशमूर्तींचे त्याठिकाणी होडीतून विसर्जन होते. मात्र इतर व्यक्तींसाठी धोका असल्याने या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला जात नाही. तशा सूचनाही वाशी पोलिसांनी दिलेल्या आहेत. असे असतानाही मानखुर्द परिसरातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी त्या ठिकाणी आणल्या जात आहेत. पाचव्या दिवशीच्या विसर्जनावेळी सुमारे २०० गणेशमूर्तींचे त्याठिकाणी विसर्जन झाले. वाशी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करुनही अनेकजण खाडीमध्ये प्रवेश करत होते. शुक्रवारी रात्रीदेखील मानखुर्दच्या काही गणेशमूर्ती वाशी खाडीपुलाखाली विसर्जनासाठी आल्या होत्या. या वेळी राजू रामभरोसे (४२) यांचा तोल जाऊन पाण्यात पडले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेऊनही त्यांचा तपास लागलेला नाही.मानखुर्द येथे बंदोबस्तावर असलेल्या मुंबई पोलिसांकडून त्या ठिकाणी आलेल्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी वाशी हद्दीत पाठवल्या जात आहेत. त्यामुळे रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशीदेखील वाशी खाडीपुलाखाली विसर्जनासाठी मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे आगमन होण्याची शक्यता आहे. सदर ठिकाणी दलदलीचा भाग असल्याने गाळात रुतून अथवा पाण्याच्या प्रवाहात व्यक्ती वाहून जाण्याची शक्यता आहे. यामुळे नवी मुंबई पोलिसांनी चेंबूर पोलिसांशी संपर्क साधून मानखुर्दच्या गणेशमूर्ती वाशीत पाठवू नये अशा सूचनाही केलेल्या आहेत. (प्रतिनिधी) (प्रतिनिधी)