बेस्ट बसला आग
By Admin | Updated: October 31, 2015 00:19 IST2015-10-31T00:19:33+5:302015-10-31T00:19:33+5:30
खारघर जलवायू विहारला जाणाऱ्या बेस्ट बसच्या इंजीनमधून सकाळी वाशीजवळ धूर येवू लागला. तत्काळ सर्व प्रवाशांना उतरविण्यात आले.

बेस्ट बसला आग
नवी मुंबई : खारघर जलवायू विहारला जाणाऱ्या बेस्ट बसच्या इंजीनमधून सकाळी वाशीजवळ धूर येवू लागला. तत्काळ सर्व प्रवाशांना उतरविण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून आग विझविल्यामुळे दुर्घटना टळली.
सायन - पनवेल महामार्गावरून खारघरकडे जात असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डिझेलवर चालणाऱ्या एमएच ०१ सीए ६१७९ या बसच्या इंजीनमधून अचानक धूर येवू लागला. चालकाने तत्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरविले व अग्निशमन दलास फोन केला.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही तत्काळ घटनास्थळी पोहचून आग विझविली. बसमध्ये फायर एक्स्टींविशर होते. परंतु त्याचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षणच चालक व वाहकांना देण्यात आलेले नव्हते. यामुळे तत्काळ आग विझविता आली नाही. (प्रतिनिधी)