शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही पक्षात राहा, पण ओबीसींच्या प्रश्नांसाठी एकत्र या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 11:34 IST

कृतज्ञता मेळावा; छगन भुजबळ यांचे ओबीसी नेत्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ओबीसी नेत्यांनी कोणत्याही पक्षात राहावे; पण समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी येथे केले. २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसीची जनगणना झाली पाहिले, अशी मागणी करून  समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.   

नवी मुंबईमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ओबीसी कृतज्ञता मेळावा झाला. छगन भुजबळ म्हणाले की, देशात समाजाची ५४ टक्के लोकसंख्या आहे. समाजाला २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. शरद  पवार यांनी देशात सर्वप्रथम मंडल आयोग स्वीकारला. त्यांनी नेहमीच ओबीसींचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. ओबीसी नेते विविध पक्षांमध्ये काम करत आहेत. पक्ष कोणताही असू द्या समाजाच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. समाजाच्या प्रश्नांसाठी लवकरच पुन्हा रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, असा आग्रह धरला. देशाचे राजकारण ताब्यात ठेवण्याची ताकद समाजामध्ये आहे. संघर्ष करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आमदार शशिकांत शिंदे यांनीही राष्ट्रवादी सर्वांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे राज राजापूरकर, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, राजू शिंदे, संदीप सुतार, जी. एस. पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. 

...तर रोजगारासाठी भटकावे लागेलजितेंद्र आव्हाड यांनी वेदांता व इतर उद्योग गुजरातला गेल्यावरून सरकारवर टीका केली. उद्योगांचे असेच स्थलांतर होत राहिले तर महाराष्ट्रातील तरुणांना उत्तर प्रदेश, बिहार प्रमाणे राज्यातील तरुणांना रोजगारासाठी इतर राज्यात जावे लागेल, असे मतही व्यक्त केले. 

तरुणांचा रोजगार हिसकावलाआमदार रोहित पवार यांनी वेदांतासह अनेक कंपन्या गुजरातला गेल्या. गुजरातच्या हितासाठी बुलेट ट्रेनचा आग्रह धरला जात आहे. उद्योगांच्या स्थलांतरामुळे तरुणांच्या हक्काचा रोजगार हिसकावला असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळOBC Reservationओबीसी आरक्षणJitendra Awhadजितेंद्र आव्हाड