घरे घेताना सावधान

By Admin | Updated: December 10, 2015 02:02 IST2015-12-10T02:02:33+5:302015-12-10T02:02:33+5:30

नैना क्षेत्रात आजही विनापरवाना बांधकामांचा धडाका सुरू आहे. मोठमोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. अशा गृहप्रकल्पांत घरे घेताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन सिडकोने नागरिकांना केले आहे

Be careful when taking houses | घरे घेताना सावधान

घरे घेताना सावधान

नवी मुंबई : नैना क्षेत्रात आजही विनापरवाना बांधकामांचा धडाका सुरू आहे. मोठमोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. अशा गृहप्रकल्पांत घरे घेताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन सिडकोने नागरिकांना केले आहे. फसवणूक टाळण्यासाठी बांधकामांची वैधता तपासून पाहावी, असेही सिडकोच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.
मुंबईपेक्षा दुप्पट क्षेत्रफळ असलेल्या नैना क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने सिडकोची नेमणूक केली आहे. त्यामुळे या क्षेत्रात कोणतेही बांधकाम करताना सिडकोची परवानगी घेणे अनिवार्य आहे. असे असले तरी कोणतीही परवानगी न घेता या क्षेत्रात बांधकामांचा धडाका सुरू आहे. परवानगी न घेता उभारण्यात येणारे सर्व गृहप्रकल्प अनधिकृत असून, त्यावर नियमाने कारवाई केली जाणार आहे. याचा फटका अशा प्रकल्पांत घरे घेणाऱ्या ग्राहकांना बसू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी जागेची मालकी व संबंधित प्राधिकरणाकडून मिळालेल्या परवानग्यांची शहानिशा करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, सिडकोने नैना क्षेत्रातील २३ गावांच्या विकासाचा एक पायलट प्रोजेक्ट तयार करून तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. विशेष म्हणजे हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सिडकोला तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लागला. या काळात या क्षेत्रातील विकासकामे रखडली. भूमाफियांनी याचा फायदा घेत मोठमोठे अनधिकृत गृहप्रकल्प उभारले आहेत. आजही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत.

Web Title: Be careful when taking houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.