शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सावध रहा, संयम बाळगा, दंगल घडविण्याचा प्रयत्न करतील; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

By नामदेव मोरे | Updated: November 20, 2023 23:15 IST

१ डिसेंबर पासून पुन्हा साखळी उपोषण; माझा जीव गेला तरी आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे न हटण्याचा निर्धार

नवी मुंबई: मराठा समाजाला आरक्षण भेटणारच आहे. लढाई निर्णायक टप्यावर आली आहे. काहीजण दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतील.  पण संयम बाळगा, सावध रहा आपणास शांततेने लढा द्यायचा आहे. माझा जीव गेला तरी चालेल पण आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. १ डिसेंबर पासून पुन्हा साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. २४ डिसेंबर ला आरक्षण दिले नाही तर मुंबईत धडक देण्याचा इशाराही दिला.

 नवी मुंबईतील घणसोली येथे सकल मराठा समाजाच्यावतीने सभेचे आयोजन केले होते. सर्व मराठा बांधवांनी निर्णायक लढ्यात योगदान द्यावे. घरोघरी जाऊन जनजागृती करावी. आरक्षणाची फाईल सरकारच्या टेबलावर आहे. २४ डिसेंबर ला आरक्षण मिळणार आहे. सरकारने मुदतीत आरक्षण दिले नाही तर २५ डिसेंबर ला पुढील लढ्याची दिशा ठरविली जाईल. आम्हाला मुंबई ला यायचे नाही. पण निर्णय झाला नाही तर आम्हाला मुंबईत यावे लागेल. मंत्रालय बघायला लागेल. येथे लय विमाने उडतात. आम्हाला विमाने बघावी लागतील असा इशाराही दिला.

  मराठा आरक्षणाच्या आड जो येईल त्याला सुट्टी नाही. पण आता लढा शेवटच्या टप्यात आला असल्याने सगळ्यांनी  संयम बाळगावा. शांततेत आंदोलन सुरू ठेवायचे आहे. छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्याचे वय झालय त्याला किंमत देऊ नका. दंगल फडकविण्याची भाषा करणारांपासून सावध रहा. हा काय काय खातो आम्हाला माहिती आहे. मुंबईत कधी आला,काय खाल्ले कुठे खाल्ले माहिती आहे. एकदा आरक्षणाचा प्रश्न सुटू द्या मग त्याच्याकडे पाहू असेही स्पष्ट केले. ओबीसी व मराठे एकदिलाने राज्यात रहात आहेत.त्यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.  पण आता आपण शांततेने लढा सुरू ठेवायचा. कुठेही शांतता भंग होऊ द्यायची नाही. माझ शरीर थकलय. पण आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. तुम्हीपण जागे रहा. घराघरात जनजागृती करा असे आवाहन ही केले. मराठा समाज ओबीसीत गेल्यात जमा आहे. म्हणून काहीजण भांडणे लावत आहेत.पण  संयम धरा लढाई आपणच जिंकणार आहोत असे स्पष्ट केले.

आरक्षणापासून वंचित कोणी ठेवले.

मराठा समाजाने सर्वांवर विश्वास ठेवला पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. यापुढे आरक्षणापासून कोणी वंचित ठेवले ते पण तपासू. सर्व मराठा समाजाचा फायदा होईल आरक्षण मिळेल असा कायदा हवा.ज्यामध्ये मराठ्यांचे हित नाही तो कायदा मान्य नाही असेही स्पष्ट केले.

दहा हजार मोबाईल चा प्रकाश 

सभेला उपस्थित नागरिकांना मोबाईल चा प्रकाश पाडण्याचे आवाहन केले.  एक क्षणात दहा हजार मोबाईल च्या प्रकाशाने मैदान उजळून निघाले