बविआचा पाठिंबा उपप्रदेशाच्या पथ्यावर
By Admin | Updated: October 31, 2014 23:03 IST2014-10-31T23:03:12+5:302014-10-31T23:03:12+5:30
बहुजन विकास आघाडीने फडणवीस सरकारला पाठींबा दिल्याचे पडसाद येत्या काही वर्षात पालघर जिल्हय़ात उमटण्याची शक्यता आहे. जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासासाठी बविआने हा पाठींबा देऊ केला आहे.

बविआचा पाठिंबा उपप्रदेशाच्या पथ्यावर
दीपक मोहिते - वसई
बहुजन विकास आघाडीने फडणवीस सरकारला पाठींबा दिल्याचे पडसाद येत्या काही वर्षात पालघर जिल्हय़ात उमटण्याची शक्यता आहे. जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासासाठी बविआने हा पाठींबा देऊ केला आहे. पाठिंबा देताना विकासाच्या मागण्याव्यतिरिक्त मंत्रीपद किंवा अन्य लाभाची अपेक्षा न करता हा निर्णय बहुजन विकास आघाडीच्या अध्यक्षांनी घेतला आहे. यापुर्वी 15 वष्रे बहुजन विकास आघाडीने आघाडी सरकारला पाठींबा दिला आणि वसई-विरार उपप्रदेशातील विविध विकासकामे मंजूर करून घेतली होती.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीने रोजगार, उद्योगधंदे वाढ, पाणीपुरवठय़ाच्या अतिरीक्त योजना, अखंडीत वीजपुरवठा, विविध वित्तीय संस्थांकडून विकासकामासाठी अर्थपुरवठा, दळणवळण आणि अन्य नागरीसुविधा इ. प्रश्न मार्गी लावण्याकरीता आपला पाठिंबा फडणवीस सरकारला देऊ केला आहे. याप्रश्नी फडणवीस सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे येणा:या काळात या उपप्रदेशाच्या विकासकामांना वेग येण्याची शक्यता आहे. राज्यशासनाला सादर केलेल्या मागण्यांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र डहाणूर्पयत वाढवणो या महत्वाच्या मागणीचा समावेश आहे. प्राधिकरणाचे क्षेत्र डहाणूर्पयत वाढल्यास आदिवासीबहुल असलेल्या या संपूर्ण परिसराची विकासकामे झपाटय़ाने मार्गी लागू शकतील.
बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ पदाधिका:यांचे भाजपातील राज्य व केंद्रीय स्तरावरील वरीष्ठ नेत्यांवरील असलेले संबंध लक्षात घेता या पाठींब्याच्या जोरावर बहुजन विकास आघाडी विकासकामासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक निधी मिळवेल अशी अपेक्षा आहे.
2क् वर्षापुर्वी वसई-विरार उपप्रदेशातील पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्यशासनाने सूर्या प्रकल्पाअंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. या योजनेस अर्थपुरवठा करणा:या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कर्जाच्या परतफेडीवरून अर्थसहाय्य रोखून धरले होते. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे या योजनेचे काम ठप्प होऊन वसई-विरार उपप्रदेशात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्याच सुमारास आघाडी सरकार अल्पमतात आले होते. सरकार कोसळण्याच्या परिस्थितीत असताना आ. हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरारच्या पाणीपुरवठा योजनेला 268 कोटी रू. चा आर्थिक निधी दिल्यास माझे 1 मत तुम्हाला मिळेल अन्यथा मी ही पाठींबा काढून घेईन असे तत्कालीन मुख्यमंत्री
कै. विलासराव देशमुख यांना स्पष्ट केले होते. त्यांच्या या इशा:यानंतर या योजनेला त्वरीत अर्थसहाय्य मिळाले आणि ही योजना 2क्क्क् मध्ये कार्यान्वित झाली. त्यानंतर सुमारे 14 वष्रे बहुजन विकास आघाडीने आघाडी सरकारला पाठिंबा दिला.