बविआ लढणार 60 जागा
By Admin | Updated: September 19, 2014 23:13 IST2014-09-19T23:13:59+5:302014-09-19T23:13:59+5:30
एकीकडे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असताना दुसरीकडे बहुजन विकास आघाडीने मात्र राज्यात 6क् जागा लढवण्याची तयारी चालवली आहे.

बविआ लढणार 60 जागा
वसई : एकीकडे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असताना दुसरीकडे बहुजन विकास आघाडीने मात्र राज्यात 6क् जागा लढवण्याची तयारी चालवली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ व मुंबई परिसरात उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. शहापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली.
बहुजन विकास आघाडीने यंदा सीमोल्लंघन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणो जिल्ह्यासह राज्याच्या अनेक मतदारसंघात निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी चालवली आहे. वसई, नालासोपारा, बोईसर, डहाणू, वाडा, शहापूर, विक्रमगड, भिवंडी ग्रामीण सह मुंबई, कोकण, विदर्भात निवडणुका लढवण्यात येत असून त्यांच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. बहुजन विकास आघाडीने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक राजकीय पक्षाच्या नाराजांनी बविआशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे.