शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची", उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 10:41 IST

शिवसेनेच्या पनवेल शहरातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. मावळ लोकसभेसाठी पिंपरी-चिंचवड येथील संजोग वाघेरे-पाटील हेच उमेदवार असल्याचेदेखील अप्रत्यक्षरीत्या सांगून लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला.

पनवेल : सध्याची लढाई मोदी विरुद्ध नसून हुकूमशाही विरुद्ध लोकशाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पनवेल येथील सभेत केली. 

शिवसेनेच्या पनवेल शहरातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. मावळ लोकसभेसाठी पिंपरी-चिंचवड येथील संजोग वाघेरे-पाटील हेच उमेदवार असल्याचेदेखील अप्रत्यक्षरीत्या सांगून लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला.

भाजपला सत्तेत येणार असल्याचा एवढाच आत्मविश्वास आहे, तर फोफाफोडी कशाला करता. अयोध्या विमानतळाचे नामकरण केले तर नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव अद्याप दिले जात नाही, यासह अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. तुम्हाला शिवसेनेने देता येईल ते सगळे दिले. तरीही आमच्या पाठीत वार केला. शिवसेना ही ओळख तुमच्यासमोर आहे म्हणून निवडून आलात. यांना वाटलं की घोड्यावर बसलोय म्हणजे घोडा माझाच. आता घोडा कसा लाथ घालतो ते कळेल, असे सांगून ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

यावेळी खासदार संजय राऊत, ‘शेकाप’चे आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, बबन पाटील, संजोग वाघेरे-पाटील आदी उपस्थित होते. शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल शहरातील कार्यालयाच्या बाजूलाच शिवसेने (उबाठा)चे नवीन कार्यालय सुरू करण्यात आल्याने खटके उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, खोपोली येथील जाखोटिया मैदानावरही उद्धव ठाकरे यांची सभा झाली.

ठाकरेंच्या सभेआधी पदाधिकारी शिंदे गटातरायगड जिल्ह्यातील उरण येथील उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची वाट धरल्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला. 

-    राज्य सरकारच्या प्रयत्नांनी येत्या वर्षभरात पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत असून त्यामुळे अनेक संधी निर्माण होणार आहेत. या संधीचा स्थानिक नागरिकांनी सर्वाधिक फायदा घ्यावा, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

‘फ्लेमिंगोंच्या जागेत सत्ताधाऱ्यांच्या मित्रांसाठी बांधकाम परवानगीनवी मुंबई महापालिकेने आपल्या प्रारूप विकास आराखड्यात फ्लेमिंगो अभयारण्याच्या परिसरात प्रस्तावित केलेले निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांचा वापरात बदल हे केंद्र आणि राज्यातील राज्यकर्त्यांच्या उद्योगपती दोस्तांसाठी केले आहेत. ठाणे खाडी परिसर फ्लेमिंगाे अभयारण्य व्हावे, म्हणून प्रयत्न केले होते. त्यामुळे त्या क्षेत्रावर काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नेरूळ येथील सभेत केली. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेpanvelपनवेल