हातरिक्षा चालकांना मिळणार बॅटरी रिक्षा
By Admin | Updated: November 13, 2014 22:43 IST2014-11-13T22:43:43+5:302014-11-13T22:43:43+5:30
माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून सुरू करण्यात आलेल्या हातरिक्षा आजही सुरू आहेत. तीन माणसांना रिक्षात बसवून रिक्षाचालक माथेरानच्या पॉईंट्स तसेच इतर ठिकाणांची सैर करतात.

हातरिक्षा चालकांना मिळणार बॅटरी रिक्षा
माथेरान : माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून सुरू करण्यात आलेल्या हातरिक्षा आजही सुरू आहेत. तीन माणसांना रिक्षात बसवून रिक्षाचालक माथेरानच्या पॉईंट्स तसेच इतर ठिकाणांची सैर करतात. मात्र इथला परिसर चढ-उताराचा असल्याने हातरिक्षा चालकाची दमछाक होते. त्यामुळे हातरिक्षांची प्रथा बंद करण्याची मागणी वाढत आहे. या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यकर्ते सुनील रामचंद्र शिंदे यांनी शिक्षक आमदार कपिल पाटील यांची भेट घेवून माथेरानमध्ये हातरिक्षा ऐवजी बॅटरी रिक्षा सुरु व्हावी, यासाठी पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.
आमदार पाटील यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन माथेरानमध्ये वाहनबंदी कायद्यात बदल करण्याची मागणी करणार असल्याचे सुनील शिंदे यांना सांगितले. 19क्7 साली माथेरान नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर इथे 1959 साली वाहनबंदीचा निर्णय केला. त्यानंतर 2क्क्3 मध्ये पर्यावरण मंत्रलयाने माथेरान इको-सेंसेटिव्ह झोन क्षेत्र जाहीर केले. यातदेखील वाहनबंदीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)
विद्याथ्र्याना फायदा
विद्याथ्र्याना दररोज 3 ते 4 कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. ती या बॅटरी रिक्षा सुरु झाल्यानंतर थांबणार आहे. या बॅटरी रिक्षांना 2क्13 मध्ये स्थानिक पातळीवर नगरपरिषद तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत आणि कार्यालयातील अधिका:यांनी परवानगी दिलेली आहे.