भातखरेदी नाशिकच्या आधारावर
By Admin | Updated: January 3, 2015 01:22 IST2015-01-03T01:22:17+5:302015-01-03T01:22:17+5:30
ठाण्यासह पालघर, रायगड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा भात आदिवासी विकास महामंडळाद्वारे खरेदी केला जात आहे. यासाठी सुमारे ४१ ठिकाणी खरेदी कें द्रे सुरू करण्यात आली आहेत.

भातखरेदी नाशिकच्या आधारावर
सुरेश लोखंडे ल्ल ठाणे
ठाण्यासह पालघर, रायगड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा भात आदिवासी विकास महामंडळाद्वारे खरेदी केला जात आहे. यासाठी सुमारे ४१ ठिकाणी खरेदी कें द्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर एकाधिकार योजनेद्वारे खरेदी होणाऱ्या भाताचा दर जवळच्या नाशिक जिल्ह्यातील खरेदीच्या आधारावर निश्चित करण्यात आला आहे.
आदिवासी, दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाताची खरेदी एकाधिकार योजनेद्वारे सुमारे एक वर्षापासून केली जात आहे. याद्वारे खरेदी करण्यात येणाऱ्या भातासह इतर धान्य खरेदीचे दर जिल्हाधिकाऱ्यांद्वारे निश्चित करण्यात येत आहेत. यासाठी स्वजिल्ह्यातील शहापूर व मुरबाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदीचे दर व जवळचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्यातील एकाधिकार योजनेच्या खरेदीचे दर आदींचा आधार घेऊन ठाणे व पालघर जिल्ह्यांतील भातखरेदीसाठी सुमारे १६२५ ते १५०० रुपये क्विंटल दर निश्चित केलेला आहे. हा भातखरेदीचा दर या आठवड्यात वाढणे अपेक्षित होते. पण, काही तांत्रिक कारणास्तव अद्याप तिन्ही जिल्ह्यांत मागील दरानेच खरेदी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाणे, पालघर व रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये ४१ भातखरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर २४ हजार क्विंटलपेक्षा जास्त भाताची खरेदी या एकाधिकार योजनेद्वारे झाली आहे. यापोटी शेतकऱ्यांना सुमारे तीन कोटी रुपयेदेखील वाटप झाले आहे. पालघर जिल्ह्यात सुमारे ३२, तर ठाणे जिल्ह्यात सुमारे आठ आणि रायगडमधील कर्जत परिसरात एक भातखरेदी केंद्रावर भाताची विक्री शेतकऱ्यांकडून केली जात आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेद्वारे ‘अ’ गे्रडच्या भाताचा दर १४०० रुपये तर बी गे्रडच्या भाताचा दर १३६० रुपये सध्या आहे. पण ठाणे, पालघर जिल्ह्यांत बी ग्रेडचा भात उत्पादित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना १३६० रुपये दराने भाताची विक्री करावी लागत आहे.
धान्यदर (रु.)
वरई२६९०
नागली१५५५
खुरासणी३९००
तूर४०००
उडीद४१००
भात अ१६२५
भात रत्नागिरी को१६२५
धान्यदर (रु.)
भात रत्नागिरी१५००
भात सोलम१५००
कर्जत १८४१५००
गुजरात १११५००
भात मसुरी बी१३७०
भात सुवर्णा१३७०
भात सी ग्रेड१२००