शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

एपीएमसीजवळ झाले गर्दुल्ल्यांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 2:49 AM

व्यावसायिक त्रस्त : तक्रारी करूनही पोलिसांकडून ठोस कारवाई नाही; भूखंडावरही अतिक्रमण

 नामदेव मोरेनवी मुंबई : एपीएमसी पोलीस स्टेशन व उपआयुक्त कार्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर अमली पदार्थ ओढणाऱ्यांचे अड्डे तयार झाले आहेत. भूखंडावर अतिक्रमण करून व महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दिवसरात्र अमली पदार्थांचे सेवन व जुगार खेळण्यात येत असून तक्रारी करूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही.

नवी मुंबईमधील गांजा विक्री व ओढणाऱ्यांचे सर्वाधिक अड्डे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आहेत. धान्य मार्केटच्या समोरील बाजूला सेक्टर १९ अ मधील भूखंड क्रमांक ४७ वर अमली पदार्थ ओढणाऱ्यांनी झोपडी तयार केली आहे. या झोपडीमध्ये दिवस - रात्र अमली पदार्थांचे सेवन करीत अनेक तरुण बसलेले असतात. येथून ये - जा करणारांना भीती वाटू लागली आहे. येथील अमली पदार्थांचे अड्डे बंद करावेत व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी व्यावसायिकांनी लेखी स्वरूपात एपीएमसी पोलिसांकडे केली आहे. याच परिसरातील भूखंड क्रमांक ३७ जवळ अशाच प्रकारे याा लोकांचा वावर सुरू असतो. याच ठिकाणी महावितरणचे सबस्टेशन आहे. या सबस्टेशनमध्ये व बाहेरही दिवसभर जुगाराचा अड्डा सुरू असतो. बिनधास्तपणे अवैध व्यवसाय सुरू असतानाही काहीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  

धान्य मार्केटच्या समोरील बाजूला अवैध प्रकार सुरू असून मार्केटच्या दुसऱ्या बाजूला एपीएमसी पोलीस स्टेशन, परिमंडळ १चे उपआयुक्त यांचे कार्यालय आहे. सहायक आयुक्तांचे कार्यालयही एक किलोमीटर अंतरावर आहे. पोलिसांची नियमित वर्दळ सुरू असलेल्या रोडजवळ असे अड्डे तयार झालेच कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे. याच परिसरात सहजपणे गांजा व इतर अमली पदार्थ उपलब्ध होतात. यामुळे गांजा ओढणारे तरुण येथील मोकळ्या भूखंडांचा आश्रय घेऊन नशा करीत बसलेले असतात.

कचराकुंडी हटविण्याचीही मागणीभूखंड क्रमांक ४७ च्या समोर कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. रोडवर ही कुंडी ठेवली असून रोडवरच कचरा पडलेला असताे. यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. येथील कचराकुंडी हटविण्याचीही मागणी करण्यात आली असून याविषयी महानगरपालिका प्रशासनास पत्र दिले आहे. 

कायदा व सुव्यवस्था धोक्यात याआधी सानपाडामध्ये गांजा ओढून भांडण करणाऱ्यांना हटकल्याने संबंधितांनी दोघांना जखमी केले होते. तर, वाशीत एक गंभीर जखमी झाला होता. एक तरूणावर लैंगिक अत्याचार झाला होता. एपीएमसी परिसरातील अड्डे वेळेत बंद न केल्यास येथे ही दुर्घटना होण्याची भीती आहे.

अनधिकृत पार्किंगया परिसरातील भूखंड क्रमांक ४७, ३७ च्या समोरील मुख्य रोडवर अनधिकृतपणे पार्किंग सुरू आहे. या पार्किंमुळेही अमली पदार्थ ओढणारांना आश्रय घेता येत आहे. येथील पार्किंग बंद करण्यात यावी अन्यथा भविष्यात एखादा गंभीर गुन्हा या परिसरात होईल, अशी भीतीही व्यावसायिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे. 

पथदिवे आहेत बंद कोपरीपासून माथाडी भवनकडे येणाऱ्या रोडच्या बाजूचे पथदिवे बंद आहेत. महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही पथदिवे सुरू केले जात नाहीत. पथदिवे नसल्यामुळे अमली पदार्थ ओढणारे व विकणारे या परिसरात तळ ठोकून बसत आहेत. लवकरात लवकर पथदिवे सुरू करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई