सुकापूरमधील बारवर पोलिसांची धाड
By Admin | Updated: October 1, 2015 23:52 IST2015-10-01T23:52:20+5:302015-10-01T23:52:20+5:30
एका महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या सुकापूर येथील एसबी नाईट या

सुकापूरमधील बारवर पोलिसांची धाड
पनवेल : एका महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या सुकापूर येथील एसबी नाईट या कुंटणखान्यावर खांदेश्वर पोलिसांनी बुधवारी रात्री धाड टाकून मालकासह तेथील वेश्या
व्यवसाय करणाऱ्या मुलींसह अशा २० जणांवर कारवाई केली.
सुकापूर येथे एसबी नाईट हा बार व लॉजिंग आहे. याठिकाणी बारच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच एका मुलीस जबरदस्तीने वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले असल्याची तक्र ार देखील पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे बुधवारी रात्री ९ च्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक सप्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याठिकाणी धाड टाकून अनैतिक व्यापार प्रतिबंधक नियमानुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर ठिकाणावरून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना अटक करण्यात आली असून मालक व आणखी एक जण फरारी आहे. अटक करण्यात आलेल्या महिला नवी मुंबई परिसरातील आहे. कारवाईत २६ हजार ५०० रु पयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई हे करीत आहेत.
पनवेलमध्ये लॉजिंगच्या नावाखाली देहव्यापार सुरु आहे. लेडीज बारचे परमीट असलेल्या बारमध्ये रात्री नऊ वाजेपर्यंतच महिला वेटर्सना काम करण्याची परवानगी असली तरी त्याचे सर्रास उल्लंघन होऊन उशिरापर्यंत बारमध्ये महिलांचा राबता असतो. पनवेल परिसरात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. मोठ्या प्रमाणात पैसा मिळाल्याने अनेक तरुण बार संस्कृतीकडे आकर्षिले जात आहेत. तसेच पुण्याकडून देखील अनेक दौलतजादे याठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत. अशाप्रकारे फोफावणाऱ्या अनैतिक व्यवसायाला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)