साकारल्या बाप्पाच्या कलाकृती
By Admin | Updated: September 14, 2015 23:43 IST2015-09-14T23:43:17+5:302015-09-14T23:43:17+5:30
बेलापूर सेक्टर १५, सिटी टॉवर या ठिकाणी गणेशाकृती कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरु झालेल्या या कार्यशाळेत सर्वच वयोगटातील

साकारल्या बाप्पाच्या कलाकृती
नवी मुंबई : बेलापूर सेक्टर १५, सिटी टॉवर या ठिकाणी गणेशाकृती कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरु झालेल्या या कार्यशाळेत सर्वच वयोगटातील कलेची आवड असलेल्या व्यक्तींना कॅलीग्राफी, चित्रकला तसेच शिल्पकलेचे धडे देण्यात आले. कलासारथी आर्ट सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत प्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव तसेच शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी सुलेखनाचे तसेच शिल्पकलेचे धडे गिरविले.
सुलेखनकार अच्युत पालव यांनी वेगवेगळ््या प्रकारे कॅलिग्राफी कशी साकारता येऊ शकते याचे प्रात्यक्षिक दाखविले. शिल्पकार भगवान रामपुरे यांनी आध्यात्मिक ओशो विजय मोहन यांचे हुबेहूब शिल्प साकारुन शिल्पकलेचे अनेक पैलू सादर केले. शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसीय कार्यशाळेत १२००हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. या कार्यशाळेत इच्छुकांना कलाकृती तयार करण्याची संधी मिळाली असून रविवापासून या गणपतीच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. या प्रसंगी माजी पालकमंत्री गणेश नाईक, नवी मुंबईचे गुन्हे शाखा उप आयुक्त सुरेश मेंगडे उपस्थित होते. सुप्रसिध्द संगीत विशारद बुधकर यांनीही या कार्यशाळेला भेट दिली. या प्रदर्शनात सेल्फी गणेश, नारळापासून बनविलेला बाप्पा, विविध वाद्ये वापरुन तसेच सर्व प्रकारच्या डाळी वापरुन तयार केलेला बाप्पा पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. हे प्रदर्शन मंगळवार दिनांक १५ सप्टेंबरपर्यंत खुले राहणार असून कलाकारांनी साकारलेल्या गणेशाकृती पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)