काँग्रेसकडून बापट यांना चित्रपटाची सीडी भेट
By Admin | Updated: September 12, 2015 23:32 IST2015-09-12T23:32:24+5:302015-09-12T23:32:24+5:30
पुणे येथे झालेल्या विद्यार्थी हक्क परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा निषेध काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

काँग्रेसकडून बापट यांना चित्रपटाची सीडी भेट
नवी मुंबई : पुणे येथे झालेल्या विद्यार्थी हक्क परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा निषेध काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी बालक-पालक या चित्रपटाची सीडी त्यांना कुरियरद्वारे पाठवण्यात आली. कसे बोलावे
व वागावे याचा बोध या
चित्रपटातून घेण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला.
पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा निषेध सर्वत्र होत असतानाच नवी मुंबई काँग्रेसने त्यांना चित्रपटाची सीडी भेट पाठवली आहे.
बापट यांचे वक्तव्य असंस्कृतीचे असून, त्यांना कसे बोलावे व वागावे याच्याच प्रशिक्षणाची गरज आहे. याकरिता त्यांना बालक-पालक या चित्रपटाची सीडी कुरियरने पाठवल्याचे काँग्रेसचे ठाणे लोकसभा अध्यक्ष निषांत भगत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)