पनवेलमधून बांगलादेशींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:43 IST2019-01-18T23:43:21+5:302019-01-18T23:43:50+5:30

पनवेल : भारत बांगलादेश सीमेवरून अनधिकृतपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या ६ बांगलादेशी नागरिकांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ ...

Bangladeshi arrested from Panvel | पनवेलमधून बांगलादेशींना अटक

पनवेलमधून बांगलादेशींना अटक

पनवेल : भारत बांगलादेश सीमेवरून अनधिकृतपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या ६ बांगलादेशी नागरिकांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ मोबाइल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जाकीर मौजूर शेख (४०, नेरे), नजमुल इमान शेख (२९, कामोठे), शोबुज शिराज सरदर (२९, बेलापूर), अलमगीर नूर मोहम्मद शेख (२८, नेरे), यासीन अराफात शेख(२०, पारगाव), हबीब मलिक शेख (३५, कोपरा) अशी बांगलादेशींची नावे आहेत.


तालुक्यातील शेडुंग व आजिवली गाव येथे बांगलादेशी वास्तव्य करत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, सहायक पोलीस निरीक्षक व्ही. खेडकर यांच्या पथकाने शेडुंगगाव विल्फ्रेड हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या डोंगर पायथ्याजवळून व आजिवली गावातून बांगलादेशींना अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bangladeshi arrested from Panvel